Kesar Malai Modak Recipe : मिठाईच्या दुकानात मिळणारे केसर मलाई मोदक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचे ठरतात. बाप्पाच्या प्रसादासाठी तु्म्ही हे मोदक सोप्या पद्धतीने घरीच तयार करु शकता. चला नोट करुन घेऊयात याची रेसिपी.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
गणेशाचे विसर्जन आता जवळ आले आहे.
विसर्जनावेळी बाप्पाला खास नैवेद्य देण्याचा विचार करत असाल.
तर तुमच्यासाठी केसर मलाई मोदकांचा पर्याय उत्तम ठरेल.
गणेशोत्सव म्हटलं की घराघरात मोदकाचा सुगंध दरवळतो. पारंपरिक उकडीचे मोदक, तळलेले मोदक यांसोबतच सणासुदीला वेगवेगळ्या चवींचे आणि आकर्षक प्रकारचे मोदक तयार करण्याचा ट्रेंडही वाढला आहे. त्यापैकीच एक म्हणजे मऊ, मलाईदार आणि सुगंधी केसर मलाई मोदक. दूध आणि मावा यांचा वापर करून तयार केला जाणारा हा मोदक चवीला स्वादिष्ट आणि दिसायला देखणाही असतो. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच पाहुण्यांना प्रसाद म्हणून देण्यासाठी हा मोदक उत्तम पर्याय ठरू शकतो. केशरामुळे मोदकाला सुंदर रंग आणि खास सुगंध मिळतो, तर वरून सजवण्यासाठी बदाम, पिस्ता किंवा काजू वापरल्यास त्याचे रूप आणखी खुलते. चला रेसिपीनोट करून घेऊयात.
सर्वप्रथम कोमट दुधात केशराच्या काड्या घालून काही मिनिटे बाजूला ठेवा. त्यामुळे केशराचा रंग आणि सुगंध दुधात व्यवस्थित उतरतो.
कढई गरम करून त्यात तूप घाला. त्यानंतर मावा घालून मंद आचेवर सतत हलवत भाजा. मावा वितळून मऊ झाल्यावर त्याचा रंग बदलणार नाही याची काळजी घ्या.
माव्यात केशर घातलेले दूध ओता आणि मिश्रण चांगले एकजीव करा. मंद आचेवर सतत ढवळत राहा.
आता त्यात साखर घालून व्यवस्थित मिसळा. साखर वितळल्यानंतर मिश्रण थोडं पातळ होईल. ते पुन्हा घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवा.
मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर वेलची पूड, बदाम आणि पिस्ते घाला. सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्या.
मिश्रण कढईच्या तळाला चिकटू न लागता एकसंध गोळ्यासारखे होऊ लागले की गॅस बंद करा. मिश्रण एका ताटात काढून थोडं कोमट होऊ द्या.
मोदकाच्या साच्याला अगदी हलका तुपाचा हात लावा. त्यात तयार मिश्रण भरून व्यवस्थित दाबा आणि साचा
उघडून मोदक अलगद बाहेर काढा. वरून पिस्त्याचे काप आणि केशराच्या काड्यांनी सजवा.
तयार केसर मलाई मोदक काही मिनिटे थंड झाल्यानंतर सर्व्ह करा.
Web Title: Ganeshotsav 2026 make halwai style kesar malai modak at home recipe in marathi