ठाकरे ब्रँड त्याच दिवशी संपला, ज्या दिवशी...; मंत्री गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. “भाजपला सोडून शिवसेना काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली, तेव्हा ठाकरे ब्रँड संपला. पण खरं सांगायचं झालं तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गेल्याचे त्या दिवशीच ठाकरे ब्रँड संपला, अशी टीका त्यांनी केली आहे.
मंत्रीमंडळ फेरबदलासंदर्भात संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचाही महाजनांनी समाचार घेतला. “संजय राऊत भाजपच्या वरच्या गोटात गेले असावेत. कारण ज्या फेरबदलाची माहिती मुख्यमंत्र्यांनाही नाही, ती संजय राऊत यांना दिल्लीतून कशी कळते, हेच गूढ आहे,” अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्यावर सत्ताधारी पक्षातील नेते शंभूराज देसाई यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “असं कोणीही आशा व्यक्त करू शकतो. आज काही लोकांना वाटतंय की मनसे आणि उबाठा एकत्र येतील. मात्र मनसे म्हणत आहे, आम्ही मराठीचा मुद्द्यावरून एकत्र आलो आहे. आमच्या पक्षात राष्ट्रीय राज्य कार्यकारणी झाली यामध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येतील अशी कोणतीही चर्चा नाही; असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.” असं देसाई यांनी ठामपणे सांगितलं.
Rohit Pawar News: जंगली रमी पे आओ ना महाराज…; रोहित पवारांकडून कृषीमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
याच संवादादरम्यान महाजन यांनी उबाठा गटातील सात ते आठ खासदार मनाने आजही भाजपसोबत असल्याचा दावा केला. दरम्यान, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच गाजतो आहे. या प्रकरणावरही गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली. “विधिमंडळात बसून रमी खेळणं कोणताही मान्य करणार नाही, हे पूर्णपणे अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.