Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondia News: ‘रेस्ट झोन ‘मध्ये नक्षलींना हादरा; गोंदियात माओवाद्यांचे सामूहिक आत्मसमर्पण

नक्षल्यांच्या धमक्यांना आणि त्यांनी दिलेल्या गोड आश्वासने, स्वप्न यांना बळी पडून जिल्ह्यातील जंगलव्याप्त भागातील काही तरूण या चळवळीत शामील झाले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 30, 2025 | 04:10 PM
Maoists surrender en masse in Gondia

Maoists surrender en masse in Gondia

Follow Us
Close
Follow Us:
  • गोंदिया जिल्ह्यात नक्षल चळवळीला हादरा
  • गोंदिया जिल्ह्यात नक्षल चळवळ १९८५ मध्ये उदयास आली.
  • २०१६ नंतर जिल्ह्यातील नक्षल चळवळ मोडकळीस
 

Gondia News: गोंदिया जिल्ह्यातील जंगलव्याप्त सालेकसा, देवरी आणि सडक अर्जुनी तसेच अर्जुनी मोरगाव तालुक्याचा काही भाग माओवाद्यांचा ‘रेस्ट झोन’ म्हणून ओळखला जातो. १९८५ पासून जिल्ह्यात चळवळीने जोर पकडला. मात्र सरकारच्या अचूक नियोजनामुळे आणि पोलिसांच्या वाढत्या दबावापुढे ही चळवळ आता पुरती लंगडी झाली. त्यातच माओवाद्यांचा वरिष्ठ नेता हिडमा चकमकीत मारला गेला. त्यानंतर नक्षल चळवळीला हादरा बसला. आता शुक्रवारी (दि. २८) रात्री दरेकसा दलमच्या ११ सशत्र माओवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यात एमएमसी झोनचा सदस्य विकास ऊर्फ नवज्योत नागपुरे याच्यासह ८९ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या माओवाद्यांचा समावेश आहे.

Mumbai Crime: नवरा पोलीस, मात्र सासरच्या छळाने बायकोने लावला गळ्याला दोर! मुंबईतली घटना

गोंदिया जिल्ह्यात नक्षल चळवळ १९८५ मध्ये उदयास आली. त्यानंतर या चळवळीला चांगला प्रतीसाद मिळाला. कारणही तसेच होते. या काळात गोंदिया जिल्ह्याच्या सीमा सध्याचा छत्तीसगड आणि त्याकाळचा मध्यप्रदेश, गडचिरोली या जिल्ह्यांना लागून असलेल्या जंगलव्याप्त भागात प्रामुख्याने आदिवासी बांधव वास्तव्यास होते. त्याकाळात या सिमावर्ती भागात रस्ते, पोलिस बंदोबस्त, शिक्षण या प्रमुख बाबी पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळे माओवाद्यांनी जल, जंगल, जमीन हे मुद्दे समोर करून भोळ्या आदिवासींना आपल्याकडे आकर्षित केले.

नक्षल्यांच्या धमक्यांना आणि त्यांनी दिलेल्या गोड आश्वासने, स्वप्न यांना बळी पडून जिल्ह्यातील जंगलव्याप्त भागातील काही तरूण या चळवळीत शामील झाले. मात्र जिल्ह्यातील जे आदिवासी या चळवळीत शामील झाले, त्यांचे या चळवळीत फक्त शोषण झाले. त्यातील काहींनी आत्मसमर्पण केले. तर काही जण चळवळीतून बाहेर पडले. मात्र १९८५ ते २००५ पर्यंत जिल्ह्यातील जंगलव्याप्त असलेला सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील काही भाग आतापर्यंत नक्षलींचा ‘रेस्ट झोन’ होता. माओवादी छत्तीसगड, तेलंगना, गडचिरोलीया भागात कारवाया करून गोंदिया जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने राहत होते. त्यानंतर ते बालाघाट जिल्ह्याकडे कूच करत होते. मात्र हळूहळू केंद्र आणि राज्य शासनाने ही चळवळ संपवून त्या भागातील आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात शामील करून घेण्यासाठी योजना आखल्या.

Salman Khanच्या ‘या’ अभिनेत्रीचा व्हिडिओ झाला व्हायरल; लूक पाहून चाहते हैराण, ओळखणेदेखील कठीण

आदिवासी, जंगल आणि नक्षलग्रस्त भागात विकासाच्या योजना पोहोचल्या. शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या संधी पोहोचल्या. रस्ते देखील मजबूत झाल्याने पोलिसांनी देखील थेट अशा ठिकाणांवर पोहोचता आले. त्यामुळे २०१६ नंतर जिल्ह्यातील नक्षल चळवळ मोडकळीस आल्यात जमा झाली. २०१८ नंतर जिल्ह्यात एकही नक्षल घटना घडली नाही, हे विशेष. केंद्र शासनाने आता मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षल चळवळ संपविण्याचा संकल्प केला. त्यानंतर यंत्रणांनी दोन हात करण्यासाठी थेट जंगलात मोर्चा मांडला. त्याचा परिपाक म्हणून नक्षलींचा वरिष्ठ नेता हिडमा माडवी देखील मारला गेला.

आत्मसमर्पण करणाऱ्यांची नावे

अनंत उर्फ विकास उर्फ नवज्योत नागपुरे उर्फ विनोद भास्कर रामास्वामी (रा. बीडीडी चाळ, वरळी, मुंबई) हा एमएमसी झोनचा सदस्य होता. त्याने एके ४७ रायफलसह २ मॅगझिन आणि दोन मोबाइलसह आत्मसमर्पण केले. त्याच्यावर २५ लाखांचे बक्षीस होते. नागसू ऊर्फ गोलू ऊर्फ पांडू पुसू वडे (३५) हा डीव्हीसीएम कमांडर होता. त्याच्याकडून एक एसएलआर, दोन मॅगझिन, १५ राऊंड जप्त करण्यात आले. त्याच्यावर १६ लाखांचे बक्षीस होते. रानो ऊर्फ रम्मी उर्फ रामे येशू नरोटे (३०) या दरेकसा एरिया सदस्याकडून दोन इन्सास मॅगझिन, १५ राऊंडसह आत्मसमर्पण केले. तिच्यावर १६ लाखांचे बक्षीस होते.

“त्या लेकराला का मारताय? तुमच्या तर…” सिंहिणीने सिंहाच्या दिली कानाखाली; बायकोचा दरारा प्राण्यांमध्येही! Viral

संतू ऊर्फ तिजाराऊराम धरमसाय पोरेटी (३५) या दरेंकसा दलमच्या सदस्याकडून ३०३ बोर बंदूर १७ राऊंडसह आत्मसमर्पण केले. त्याच्यावर ६ लाखांचे बक्षीस होते. संगिता ऊर्फ शेवंती रायसिंग पंधरे (३२) हिच्यावर ६ लाखांचे बक्षीस, प्रताप ऊर्फ समर ऊर्फ काशीराम राजय्या बंतुला (६२) या टेक्निशिअनवर ६ लाखांचे, अनुजा ऊर्फ नक्के सुकलु कारा (५५) या टेक्निशनअनवर ६ लाख, पूजा ऊर्फ जुगनी ऊर्फ सन्नु मुडियम (२७) हिच्याकडून एक सिंगल शॉट बंदूक जप्त करण्यात आली. तिच्यावर २ लाखांचे बक्षीस, दिनेश ऊर्फ सादु पुलाई सोटी (३०) या अनंतच्या गार्डकडून एक सिंगल शॉट बंदूक जप्त करण्यात आली.

 

 

 

Web Title: Gondia maoist surrender 11 naxals rest zone end 11 maoists surrender gondia naxal operations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 04:10 PM

Topics:  

  • Gondia Crime
  • Gondia District

संबंधित बातम्या

Gondia Crime: 10 दिवसांच्या बाळाची विक्री, डॉक्टरचा टोकाचा निर्णय; गोंदिया प्रकरणाने राज्यात खळबळ
1

Gondia Crime: 10 दिवसांच्या बाळाची विक्री, डॉक्टरचा टोकाचा निर्णय; गोंदिया प्रकरणाने राज्यात खळबळ

Gondia Crime: ‘लॉलीपॉप’ म्हणाल्याच्या गैरसमजातून शिक्षिकेचा संताप; ९ वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण
2

Gondia Crime: ‘लॉलीपॉप’ म्हणाल्याच्या गैरसमजातून शिक्षिकेचा संताप; ९ वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.