Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाई तालुक्यातील भोगावमध्ये अवकाळीचा तडाखा; घरावरील पत्रे उडाले अन्…; प्रांताधिकाऱ्यांनी केली पाहणी

प्रांत अधिकाऱ्यांनी नुकसानीचे सविस्तर निरीक्षण करून पीडित कुटुंबाशी संवाद साधला व शासन स्तरावरून तात्काळ मदत मिळवून देण्याचे ठाम आश्वासन दिले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 02, 2026 | 06:32 PM
वाई तालुक्यातील भोगावमध्ये अवकाळीचा तडाखा; घरावरील पत्रे उडाले अन्...; प्रांताधिकाऱ्यांनी केली पाहणी

वाई तालुक्यातील भोगावमध्ये अवकाळीचा तडाखा; घरावरील पत्रे उडाले अन्...; प्रांताधिकाऱ्यांनी केली पाहणी

Follow Us
Follow Us:

वाई येथे वादळी पावसाने मोठे नुकसान
प्रांत अधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष भेट व पाहणी
राज्यभरात अवकळी पावसाचा धुमाकूळ

वाई: भोगाव येथील वादळी पावसात नुकसान झालेल्या कुटुंबाच्या नुकसानीची दखल घेत वाईचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) डॉ. योगेश खरमाटे यांनी थेट पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन पाहणी केली. वाई तालुक्यातील मौजे भोगाव (नेहर वस्ती) येथे दि. १ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास.चक्रीवादळासारख्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला.

या वादळात सुनील नारायण येवले यांच्या घरावरील चार खोल्यांचे पत्रे उडून गेल्याने घरातील धान्य, फर्निचर व इतर संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे येवले कुटुंब अक्षरशः बेघर झाले या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. श्री. योगेश खरमाटे,गट विकास अधिकारी नारायण घोलप यांनी पीडित कुटुंबाला समक्ष भेट दिली.

प्रांत अधिकाऱ्यांनी नुकसानीचे सविस्तर निरीक्षण करून पीडित कुटुंबाशी संवाद साधला व शासन स्तरावरून तात्काळ मदत मिळवून देण्याचे ठाम आश्वासन दिले. या प्रांत भेटीदरम्यान भोगाव तलाठी शितल वाघ, भोगाव ग्रामपंचायत अधिकारी योगेश खोपडे व महसूल सहायक दत्तात्रय काळे उपस्थित होते. स्थानिक प्रशासनाने वादग्रस्त भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा व मदत मागण्याचा आवाहन केले आहे.

भोर तालुक्यात कुटुंबे उघड्यावर; गारपीठ अन् वादळी पावसामुळे शेतीसह घरांचे अतोनात नुकसान

भोर तालुक्यात कुटुंबे उघड्यावर

भोर शहरासह ग्रामीण भागात सोमवारी झालेल्या अवकाळी गारपीठ आणि वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांचे छप्पर उडाल्याने सामान्य नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. भर पावसात आणि गारपिठीने काढणीला आलेल्या गहू, कांदा, ज्वारी, यासारख्या रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आंबा बागांनाही या अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितांची जुळवाजुळव कोलमडली आहे. तर जनावरांसाठी साठवलेला चारा भिजल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पिंपरी-चिंचवडला अवकाळीचा तडाखा; कडाक्याच्या उन्हात कोसळल्या पावसाच्या सरी

वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने व खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला. महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील वडगाव डाळ येथे ग्रामदेवता यात्रेनिमित्त उभारलेला मांडव उडून गेला. उज्वला विजय चव्हाण यांच्या घराचे छप्पर उडून सुरेश यदु गायकवाड यांच्या घरावर पडल्याने त्यांच्याही घराचे नुकसान झाले. त्यात ते जखमी झाले आहेत. इतर गावांत देखील घरांची पडझड झालेल्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.

Web Title: Government officer visit to bhogav damage of houses in unseasonal rain at wai satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • Satara News
  • Unseasonal Rain
  • Wai News

संबंधित बातम्या

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
1

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
2

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
3

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल
4

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.