Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भिडेंना चावणाऱ्या कुत्र्याची सरकारने एसआयटी चौकशी केली पाहिजे’; विजय वडेट्टीवार यांचा टोला

संभाजी भिडे यांचे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. पुणे, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, मुंबई आणि सातारा येथील अनेक लोक त्यांना मानतात. त्यांनी ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संस्थेची स्थापना केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 16, 2025 | 11:27 AM
'भिडेंना चावणाऱ्या कुत्र्याची सरकारने एसआयटी चौकशी केली पाहिजे'; विजय वडेट्टीवार यांचा टोला

'भिडेंना चावणाऱ्या कुत्र्याची सरकारने एसआयटी चौकशी केली पाहिजे'; विजय वडेट्टीवार यांचा टोला

Follow Us
Close
Follow Us:

चंद्रपूर : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ ​​मनोहर भिडे यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कुत्रा चावल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे. यावरूनच आता काँग्रेस विधीमंडळ नेते तथा ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे. ‘त्या कुत्र्याला इतकी काय दुर्बुध्दी सुचली, कुणाला चावावे कळले नाही. याचे वाईट वाटते. त्यामुळे भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याची एसआयटी चौकशी सरकारने केली पाहिजे’, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते वडेट्टीवार चंद्रपुरात शासकीय विश्रामगृहावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘दिवगंत लता मंगेशकर श्रेष्ठ गायिका होत्या. छान गायच्या. जनतेचा त्यांना प्रतिसाद होता. हे सर्व आम्ही मान्य करतो. मात्र, सामाजिक योगदानाचे काय? असाही प्रश्न उपस्थित केला. मुंबईतील पेडर रस्त्यावरच्या उड्डाणपुलाला त्यांनी वैयक्तिक कारणांसाठी विरोध केला होता. विशेष म्हणजे, तेव्हा लता मंगेशकर यांनी देश सोडण्याची धमकीही दिली होती. मंगेशकर यांचे सामाजिक योगदान नाही. या वक्तव्यावर मी आजही ठाम आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.


तसेच संभाजी भिडे यांना कुत्रा चावल्याच्या घटनेवर वडेट्टीवार यांनी म्हटले की, ‘कुत्रा हा प्रामाणिक प्राणी आहे. मात्र, या प्रामाणिक प्राण्याने भिडे गुरुजी यांचा इतका का राग धरला याची देखील चौकशी झाली पाहिजे’.

संभाजी भिडे कोण आहेत?

संभाजी भिडे यांचे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. पुणे, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, मुंबई आणि सातारा येथील अनेक लोक त्यांना मानतात. त्यांनी ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संस्थेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी शिकवायला सुरुवात केली. त्यांचे सर्व पक्षांतील राजकारण्यांशी संबंध होते. पण ते राजकारणात आले नाही.

पंतप्रधान मोदी यांच्याशी चांगले संबंध

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संभाजी भिडे यांचे चांगले संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संभाजी भिडेंना गुरुजी म्हणतात. उदयनराजे भोसले आणि शरद पवार यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संभाजी भिडे यांच्याशी चांगले संबंध होते. दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम आणि राष्ट्रवादी नेते आर.आर. पाटील हे त्यांच्याशी जवळचे नाते राहिले आहेत.

Web Title: Government should conduct an sit investigation into the dog that bit bhide criticism of vijay wadettiwar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 11:27 AM

Topics:  

  • Maharashtra Government
  • sambhaji bhide
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय
1

Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी पूर्ण; लवकरच दिलासा मिळणार…
2

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी पूर्ण; लवकरच दिलासा मिळणार…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; ‘या’ मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
3

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; ‘या’ मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक

‘अजित पवारांच्या अपघातप्रकरणाचा खुलासा सरकारने तात्काळ करावा’; ‘या’ बड्या नेत्याची मागणी
4

‘अजित पवारांच्या अपघातप्रकरणाचा खुलासा सरकारने तात्काळ करावा’; ‘या’ बड्या नेत्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.