मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवार यांनी केलं मोठं विधान
पुणे : पुण्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले असून धरण पूर्णपणे भरले आहे. मात्र मुठा नदीला पाणी सोडल्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये व वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे नागरिकांचा मोठी गैरसोय होत आहे. या परिस्थितीमध्ये बंधारे विभाग, महानगर पालिका व अग्निशमन दल नागिरकांची तप्तरतेने मदत करत आहे. या पुण्यातील पूरसदृश्य परिस्थितीवर पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच कालपासूनच पुणे रेड अलर्टवर असल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले आहे.
पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पुण्यातील पावसातील परिस्थितीबाबत भूमिका मांडली. प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना आणि सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत. ते म्हणाले, पुणे व आसपासच्या भागात अतीमुसळधार पावसाचा रेड अलर्ट बुधवारीच देण्यात आला होता. आज पुणे-पिंपरी-चिंचवडच्या शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत. पण आपल्याकडचं खडकवासला धरणं पावणे तीन टीएमसीचंच आहे. खडकवासलाच्या वरच्या भागात ८ इंचापेक्षा जास्त पाऊस पडला. पुण्यात जवळपास पाच इंच पाऊस झाला. खडकवासला धरणं तर लगेच भरतं. धरण पावणेतीन टीएमसी आणि वरून साडेतीन टीएमसी पाणी आल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडावे लागले. 45 हजारांपेक्षा जास्तीचा विसर्ग धरणातून सोडला. आम्ही पहाटे पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. रात्री पाणी सोडलं असतं तर लोक झोपेत असतानाच त्यांच्या घरांमध्ये पाणी शिरलं असतं. त्याचा लोकांना त्रास झाला असता. त्यामुळे पहाटे पाणी सोडण्यात आलं, असे मत अजित पवार यांनी मांडले.
पुढे पालकमंत्री म्हणाले, “पुण्याला मुठा नदीला सोडलेले पाणी आत्ता बंडगार्डनला पोहोचलं आहे. दौंडला पोहोचलेलं नाही. त्याला अजून काही तास लागतील. त्यानंतर ते पाणी उजनीमध्ये जाईल. दौंडला कमी क्युसेक्सनंच पाणी जात आहे. काही ठिकाणी पाऊस सलग चालू राहिला दरडी कोसळतात. त्यामुळे लोकांनी फार गरजेचं असेल तरच बाहेर पडावं. नाहीतर सुरक्षेच्या दृष्टीने सगळ्यांनी आपापल्या ठिकाणीच राहणं आवश्यक आहे. पुण्यात निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीमध्ये एनडीआरएफची बचावपथकं काम करत आहेत. त्याचवेळी राज्याच्या इतर भागातही एनडीआरएफ, एसडीआरएफची पथकं सज्ज असल्याची माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.