Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने गुहागर बीचवर स्वच्छता अभियान, समुद्रकिनारा झाला चकाचक

महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनाच्या निमित्ताने गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने गुहागर बीचवर स्वच्छता अभियान राबवले. यावेळी गुहागर समुद्रकिनारा अधिक स्वच्छ आणि छान दिसू लागला.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 04, 2025 | 08:04 PM
गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने गुहागर बीचवर स्वच्छता अभियान, समुद्रकिनारा झाला चकाचक

गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने गुहागर बीचवर स्वच्छता अभियान, समुद्रकिनारा झाला चकाचक

Follow Us
Close
Follow Us:

रत्नागिरी/जमीर खलफे: स्वच्छतेचे महत्व आपण सगळेच जाणतो. पण तरी देखील अनेक जण आपापला परिसर स्वच्छ ठेवताना दिसत नाही. खासकरून पर्यटनाच्या ठिकाणी तर अनेकदा आपल्याला अस्वच्छता दिसून येत असते. जर आपणच आपली पर्यटन स्थळे चांगली आणि स्वच्छ ठेवली नाहीत तर मग बाहेरील पर्यटकांच्या मनात नक्कीच आपल्याविषयी चुकीची प्रतिमा बनेल.

कोकणाला निसर्गाने भरभरून दिले आहे. येथील समुद्रकिनारे तर पर्यटकांसाठी पर्वणीच असते. असाच एक सुंदर आणि मनमोहक समुद्रकिनारा म्हणजे गुहागरचा समुद्रकिनारा. याच समुद्रकिनाऱ्यावर स्वछता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. चला या महत्वाकांक्षी अभियानाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

दापोली शहरात गॅस सिलेंडरचा स्फोट; मोठा अनर्थ होता-होता टळला, पती पत्नीने गमावली ऐकण्याची क्षमता

महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनाच्या (पोलीस रेझिंग डे )अनुषंगाने गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत .त्या अनुषंगाने शुक्रवारी सकाळी गुहागर पोलीस परेड मैदान व गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

सदर अभियानामध्ये तीन किलोमीटर समुद्रकिनाऱ्याची साफसफाई करण्यात आली. यामध्ये स्वच्छता अभियानामध्ये गुहागर मधील सामाजिक संस्था लायन्स क्लब ऑफ गुहागर सीटी, जीवनश्री प्रतिष्ठान, गुहागर तालुका पत्रकार संघ, तसेच नगरपंचायत गुहागर, सर्व पोलीस कर्मचारी व होमगार्ड, रत्नागिरी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक, श्री देव गोपाल कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर येथील विद्यार्थी, शिक्षक, मँगो व्हीलेज, गुहागर,एनसीसी पथक आदी सहभागी झाले होते. या सर्वांचे गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

विचार भिन्नता नव्हे तर विचार शून्यता ही आपली समस्या; पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

गुहागर समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता गुहागर नगरपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी सतत करत असतात परंतु वर्ष अखेर व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो पर्यटक गुहागर मध्ये दाखल झाले होते. तसेच स्थानिक नागरिक सुद्धा या समरकिनारी मनसोक्त आनंद घेत असतात.त्यामुळे समुद्रकिनारी अस्वच्छतेचे प्रमाण वाढले होते. पोलीस रेझिंग डे निमित्ताने गुहागर समुद्रकिनारा चकाचक झालेला दिसून येत आहे.गुहागर पोलीस ठाणे यांच्यावतीने पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून पोलीस व समाजामधील जवळीकता व आत्मीयता वाढविणे, महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा याकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत.

शुक्रवारी झालेल्या स्वच्छता अभियानामध्ये गुहागर तालुक्यातील सर्व सामाजिक संस्थांनी सहभाग घेऊन स्वच्छतेचा एक वेगळा संदेश नागरिकांना दिला. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब राशिनकर यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी मानले.

Web Title: Guhagar police station oraganized swachata abhiyan on guhagar beach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2025 | 08:03 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Swachhta Mission

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
1

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे
2

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
4

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.