
महापालिकेने ‘कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी प्रभागांमधील कचराकुंड्या हटवून घंटागाड्यांची संख्या वाढवली, सुरुवातीला नागरिकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, परंतु आता हीच यंत्रणा कोलमडताना दिसत आहे. कालेवाडी फाटा, डांगे चौक, जगताप हेअरी, रावेत मार्ग आणि विविध बीआरटी स्थानकांच्या धरिसरात आजही कचरा उघड्यावर टाकला जात आहे. उडाणपुलांखालील मोकळ्या जागा आणि सरकारी भूखंड आता अघोषित ‘कचरा जेपी बनले आहेत.
१) पिंपरीगावः लोकसंख्या वाढली, गाड्या घटल्या : पिंपरीगावात कचरा संकलनासाठी घंटागाड्यांची संख्या अत्यंत अपुरी आहे. अनेक गाड्या नादुरुस्त असल्याने उपलब्ध गाड्यांवर ताण येत आहे. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने नागरिक रस्त्याकडेला कचरा टाकत आहेत. ओला, सुका आणि घातक अशा पाच प्रकारच्या वर्गीकरणाचे आवाहन केले जात असले, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत आनंदीआनंदच आहे.
२) चिंचवड नियोजनाचा अभाव आणि अनियमितता चिंचवड परिसरात रस्ते सफाई नियमित होत असली तरी घंटागाडीच्या वेळेचा पत्ता नसतो. नोकरीनिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना गाडीची प्रतीक्षा करणे शक्य होत नसल्याने, रात्रीच्या वेळी कचरा उघड्यावर टाकला जातो. विशेषतः पवना नदीकाठ आणि प्रेमलोक पार्क परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. काचेच्या वस्तूंच्या विल्हेवाटीसाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नसल्याने समस्या अधिक जटील बनली आहे.
३) निगडी प्राधिकरणः निसर्गरम्य परिसरात पालापाचोळ्याचा प्रश्न शहरातील सर्वात विकसित भाग समजल्या जाणाऱ्या निगडी प्राधिकरणात झाडांच्या पालापाचोळ्याचा मोठा प्रश्न आहे. हा कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने तो रस्त्याकडेला साचतो. मोकाट कुत्र्यांकडून कचऱ्याच्या पिशव्या फाडल्या जात असल्याने परिसरात दुर्गंधी आणि रोगराई पसरत आहे.
अनियमित वेळः घंटागाड्यांच्या येण्याची वेळ निश्चित नसल्याने नागरिकांची गैरसोय.
अपुरी यंत्रणा वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत घंटागाड्या आणि कर्मचारी कमी.
अपुर्ण वर्गीकरण : ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत गांभीर्याचा अभाव.
दंडात्मक कारवाईचा अभावः उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने धाक उरलेला नाही.
महापालिका प्रशासनाने रात्रीच्या वेळी रस्ते सफाई आणि यंत्राद्वारे स्वच्छतेचे धोरण स्वीकारले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार कच-याची शास्त्रीय विल्हेवाट लावणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. मात्र, हॉटेल व्यावसायिक, फेरीवाले आणि काही बेजबाबदार नागरिकांकडून होणारे कचरा फेकीचे प्रकार थांबवण्यात पालिकेचा आरोग्य विभाग अपयशी ठरताना दिसत आहे.
● घंटागाडी वेळेत येते आणि ओला-सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जातो. रस्ता स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता कर्मचारीदेखील येतात, पण काही नागरिक आणि आस्थापना रस्त्यावर कचरा टाकतात. हे थांबले पाहिजे,
संतोष पवार, चिंचवड,
● घंटागाडी सकाळी वेळेत येते पण नागरी वस्तीत दोनवेळा गाडी आली पाहिजे. आमच्या घरात सर्वजण कामासाठी बाहेर पडतात म्हणून कचरा हा रोज टाकला जात नाही, त्यांना सायंकाळी कचरा गाडी आली तर कचरा बाहेर टाकण्याची वेळ येणार नाही,
– अभिजीत टाक, निगडी
व्यावसायिक आणि हॉटेल कचऱ्याचे गौडबंगाल ?
रात्रीचा ‘कचरा फेको’ कार्यक्रमः अनेक हॉटेल चालक आणि छोटे व्यावसायिक कचरा संकलन शुल्कापासून वाचण्यासाठी रात्रीच्या अधारात आपला कचरा बीआरटी मार्ग किया उड्डाणपुलांखाली टाकून देतात.
फेरीवाल्यांचे अतिक्रमणः खाद्यपदार्थ विक्रेते आणि भाजी विक्रेते दिवसाचा व्यवसाय संपल्यानंतर उरलेला कचरा रस्त्यावरच सोडून जातात, ज्यामुळे सकाळी परिसरात दुर्गंधी पसरते.