१८रोजी सदर रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हॉस्पीटल सोलापूर येथे ICU मध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांना हातपायातील ताकद कमी असणे, अतिसार, तसेच अन्न गिळल्यास त्रास इ. लक्षणे होती. डॉक्टरांनी त्यांना २५ vials IVIG ५ दिवसासाठी सुरु केले. प्रथम रुग्णाची प्रकृती बिघडत चालली असताना पाचव्या दिवशी तब्येत मध्ये सुधारणा झाली. त्यावेळी त्यांना २४ रोजी ward मध्ये शिफ्ट करण्यात आले. परंतु २५ रोजी त्यांना श्वसनाचा त्रास सुरु झाल्याने त्यांना।CU मध्ये शिफ्ट करण्यात आले. त्यावेळी त्यांचा रक्तदाब अतिशय कमी झाल्याने डॉक्टरांकडून त्यांना CPR देण्यात आले. पण त्यांच्या प्रकृती मध्ये सुधारणा झाली नाही. त्यावेळी डॉक्टरानी सदर रुग्णास संध्या ७.४० रोजी मयत घोषित करण्यात आले.
हेही वाचा: Guillain-Barré Syndrome : पुण्यात GBS आजाराचं थैमान सुरूच, 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर; तर एकाच मृत्यू
– हात स्वच्छ धुवावे, उकळलेले पाणी प्यावे असे महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन
हेही वाचा: पुण्यात पसरलेल्या GBS च्या उपायासाठी किती येतोय खर्च? तुमच्या खिशाला परवडेल की नाही
मागील अनेक दिवसांपासून राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे (GBS) या दुर्मिळ आजारांचे रुग्ण आढळत आहेत. यामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. GBS च्या रुग्णात वाढ झाली आहे. पुण्यामध्ये या आजाराचे अधिक रुग्ण आढळत आहेत. पुण्यात GBS या आजाराचे तब्बल 74 रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णांपैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर पुण्यात एकाचा मृत्यू देखील झाला आहे.