कडक उन्हाचा शेतीला देखील फटका; तीव्र झळांमुळे केळी बागा होरपळल्या, शेतकरी चिंतेत
यंदाचा उन्हाळा कडक असल्यामुळे याचा परिणाम मनुष्य आणि प्राण्यांसह शेतीवर देखील होेऊ लागला आहे. संपूर्ण राज्यासह जुन्नर तालुक्यात सध्या उन्हाचा पारा चढला आहे.
जुन्नर : सध्या राज्यभरामध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. यंदाचा उन्हाळा कडक असल्यामुळे याचा परिणाम मनुष्य आणि प्राण्यांसह शेतीवर देखील होेऊ लागला आहे. संपूर्ण राज्यासह जुन्नर तालुक्यात सध्या उन्हाचा पारा चढला आहे. याचा परिणाम शेती आणि केळीच्या बागावर दिसून येत आहे़. वाढत्या तापमानामुळे केळीचे झाडे करपण्यास सुरुवात झाली़ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे केळीची झाडे अर्ध्यातून मोडून बागांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत़. मागील १५ दिवसांपासून तापमान 38 ते 40 अंशापर्यंत गेल्याने केळीच्या बागांना तापमानाचा फटका बसला असल्याचे ओतूर येथील केळी उत्पादक शेतकरी धनंजय डुंबरे यांनी सांगितले . त्याचबरोबर वीजपुरवठा खंडित असल्याने आणि वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने विहीर व बोअरवरील वीजपंप चालत नाहीत. त्याचाही परिणाम केळीच्या बागावर होत असल्याचे सांगण्यात येत आहे़. केळी पिकाला पाणी मिळत नसल्याने झाडे अर्ध्यातून मोडून पडत आहेत़. योग्य काढणीच्या वेळी तापमानात वाढ झाल्याने केळीच्या झाडाचे वजन कमी भरत असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़. सध्या तापमानाचा पारा 38 अंशांपर्यंत पोहोचला आहे. मोठ्या मेहनतीने जोपासलेली केळी काढणीच्या वेळी तापमानात वाढ झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. गतवर्षी केळीचे मोठे नुकसान झाले होते. अनेक संकटांतून सावरलेल्या केळीच्या बागा मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे पुन्हा एकदा संकटात सापडलेल्या असल्याचे चित्र सध्या अणे माळशेज पट्ट्यात दिसून येत आहे़.
उन्हाचा पारा चढला असून हवेत देखील प्रचंड उष्णतेची लाट निर्माण झाली आहे.वाऱ्यामुळे केळीची पाने पूर्णतः फाटत आहेत. उष्णतेमुळे संपूर्ण केळीबागा जळताना दिसत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. चढत्या तापमानामुळे नागरिकांचे घराबाहेर निघणे दुरापास्त झाले असून, वाढत्या उष्ण झळांचा फटका शेती पिकांनाही बसू लागला आहे. जुन्नर तालुक्यातील अणे-माळशेज परिसरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे केळी पिकांची वाताहत झाली असून, केळीबागा करपू लागल्या आहेत.
Web Title: Harsh heat also hits agriculture due to intense heat the banana plantations were damaged the farmers were worried in maharashtra nrpm