
Heaps of garbage have accumulated everywhere in Vasmat filth has piled up Nanded News
Nanded News : वसमत : नगरपालिकेच्या निवडणुका पार पडून नवे नेतृत्व येण्याची प्रक्रिया सुरू असताना वसमत शहर मात्र आज घडीला अक्षरशः घाणीच्या साम्राज्यात अडकले आहे. शहराची स्वच्छता व्यवस्था पूर्णतः ढासळली असून रस्ते, गल्लीबोळ, चौक-चौरस्ते आणि रहिवासी भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मुख्य रस्त्यांवर कधीतरी दिखाऊ सफाई केली जाते; मात्र अंतर्गत भागांत तीन महिन्यांपासून नरकसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाल्यांतून सांडपाणी, दुर्गंधीने नागरिक हैराण शहरातील अनेक भागांत नाल्यांची महिनोन्महिने सफाई झालेली नाही. परिणामी सांडपाणी थेट रस्त्यांवर वाहत असून दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. साथीच्या आजारांचा धोका वाढला असून लहान मुले, वृद्ध व महिलांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. “हाच का विकास?” असा संतप्त सवाल आता नागरिक खुलेआम विचारू लागले आहेत.
हे देखील वाचा : नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट! डहाणूत अवैध सावकारीचा बळी; ५ खाजगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल
घंटागाडी गायब, कचरा टाकायचा तरी कुठे? “तू चूप, मी चूप”
गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील अनेक प्रभागांत घंटागाडीच दिसत नसल्याचे चित्र आहे. वसमत शहरात एकूण १५ प्रभाग व ३० वॉर्ड असताना केवळ १५ घंटागाड्या उपलब्ध आहेत. त्यातीलही ५ ते ६ घंटागाड्या बंद अवस्थेत आहेत. उर्वरित गाड्या इतक्या अपुऱ्या ठरत आहेत की ३० वॉर्डमधील कचरा वेळेवर उचलणे अशक्य झाले आहे. नाईलाजाने नागरिक रस्त्यावर, मोकळ्या जागेत किंवा नाल्यांत कचरा टाकत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.
कर्मचारी टंचाई आणि गैरवापराचे आरोप सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही स्थायी स्वच्छता कर्मचारी नगरसेवकांच्या किंवा प्रभावशाली व्यक्तींच्या खासगी घरांवर काम करत असल्याची चर्चा आहे. जर हे खरे असेल, तर ही गंभीर प्रशासनाच्या अनियमितता असून नियंत्रणाचा पूर्ण अभाव दर्शवणारी बाब आहे. “तू चूप, मी चूप” अधिकाऱ्यांवर कुणाचाच अंकुश नाही. मुख्याधिकारी, स्वच्छता निरीक्षक, अभियंते आणि वरिष्ठ अधिकारी कुणावरही प्रभावी नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. जबाबदारी निश्चित न झाल्याने संपूर्ण यंत्रणा सुस्त झाली असून नागरिकांना त्याची मोठी किंमत मोजावी लागत आहे.
हे देखील वाचा : “अजेंठा कुठे आहे? ही स्वार्थाची अन् खुर्चीची युती; एकनाथ शिंदेंचे ठाकरे बंधूंवर टीकास्त्र
पाच वर्षे ठोस नेतृत्वाविना कारभार गेल्या पाच वर्षात नगरपालिकेला प्रभावी नेतृत्व लाभले नाही. नगराध्यक्ष व नगरसेवकांचा प्रशासनावर दबाव राहिला नाही, परिणामी स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. नागरिकांची ठाम मागणी आता कृती हवी वसमतकरांची भूमिका स्पष्ट आहे. नियमित कचरा उचल नाल्यांची तातडीने सफाई करारावरील कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन कर्मचारी व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चिती स्वच्छता व्यवस्थेवर कडक नियंत्रण नव्या नगरपालिकेकडून आता केवळ आश्वासने नकोत, तर तत्काळ कृती हवी आहे.
१६७ कर्मचारी, पण प्रत्यक्ष सफाईसाठी केवळ ६५
वनमत नगरपालिकेत एकूण १६७ स्थायी कर्मचारी मंजूस हेत. मात्र यापैकी केवळ ६५ कर्मचारी प्रत्यक्षा फसफाईच्या कामावर आहेत. उर्वरित १०२ कर्मचारी लपुरवठा, कार्यालयीन कामे, गार्डन किवा इतर विभागांत र्यरत आहेत. ६५ कर्मचा-यांवर संपूर्ण शहराची जबाबदारी सल्याने वसमतसारख्या शहराची स्वच्छता या मुष्यबळावर होणे अशक्य असल्याचे स्पष्ट होत आहे. रारावरचे १०० हून अधिक कर्मचारी कामावरून गायका पूर्वी घंटा गाड़ी मार्फत कचरा उचलणारे १०० हून अधिक राराधारित स्वच्छता कर्मचारी कार्यरत होते. या र्मचा-यांना दीड महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांनी म बंद केले. या करारासाठी नगरपालिकेकडून दरमहा नारे ३५ लाख रुपये खर्च होत असल्याची माहिती आहे. आज दोन महिने उलटूनही शहरातील कचरा उचल तिः ठप्प आहे.