Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हौसलों से उड़ान होती है! दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हात नसलेला सूरज उबाळे पायाने लिहितो पेपर

सध्या बोर्डाच्या परिक्षा सुरु आहेत. यामध्ये नांदेडमधील शिवाजी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रात जिद्दी विद्यार्थी सूरज शिवराज उबाळे हा पायाने पेपर लिहित होता. जन्मतः पाय नसलेल्या सूरजचा प्रवास प्रेरणादायी आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 16, 2026 | 03:40 PM
Suraj Ubale born without arms writes his 12th standard paper using his feet Nanded

Suraj Ubale born without arms writes his 12th standard paper using his feet Nanded

Follow Us
Close
Follow Us:

Nanded News : नांदेड: कंधारच्या नवरंगपुरा येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रात बारावीच्या इंग्रजी पेपरची नेहमीची लगबग सुरू होती. घंटा वाजली, प्रश्नपत्रिका हातात आल्या आणि विद्यार्थ्यांचे लक्ष उत्तरपत्रिकेकडे खिळले. (HSC Exam 2026) मात्र या गर्दीत एक शांत, पण विलक्षण प्रेरक दृश्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पायाच्या बोटांत पेन पकडून एक विद्यार्थी अत्यंत आत्मविश्वासाने उत्तरपत्रिका लिहित होता. परीक्षा केंद्रातील अधिकारी, पर्यवेक्षक आणि शिक्षक क्षणभर स्तब्ध झाले; कारण तो होता गाडेगावचा जन्मतः हात नसलेला पण जिद्दी विद्यार्थी सूरज शिवराज उबाळे. “अडथळे शरीरात नसतात, ते मनात असतात,” हा संदेश त्या क्षणी जिवंत झाला होता. नियमांनुसार लेखनिक घेण्याचा पर्याय उपलब्ध असतानाही सूरजने स्वाभिमानाची वाट निवडली. पायांनाच हात बनवत त्याने स्वतःच पेपर लिहिण्याचा निर्धार केला. (Nanded News)

त्याच्या शांत चेहऱ्यावर तक्रार नव्हत हतबलता नव्हती, होती फक्त एकाग्रत आणि जिद्दी. संघर्षातून घडलेले धैर्य. डॉ. ए. पी जे. अब्दुल कलाम सांगतात, “स्वप्न व नसतात जी झोपेत दिसतात, स्वप्न व असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. सूरजची प्रत्येक ओळ हे अशाच स्वप्नाचे सार्थ उदाहरण ठरत होते.

हे देखील वाचा :  टिपू सुलतान वादावरून संभाजीनगर तापले! Harshvardhan Sapkal यांच्या विरोधात भाजपचे ‘जोडे मारो’ आंदोलन

आत्मविश्वास आणि स्वाभिमानाची नवी व्याख्या लिहिली

सूरजचे जीवन म्हणजे अडचणींना दिलेले सकारात्मक उत्तर आहे. जन्मतः हात नसतानाही त्याने दैनंदिन आयुष्याची प्रत्येक गोष्ट स्वतः शिकली. पायांच्या मदतीने जेवण, लेखन आणि इतर कामे करत तो स्वावलंबनाकडे वाटचाल करत आहे. शेतकरी असलेले त्याचे वडील शिवराज उबाळे यांनी मुलाला केवळ सहानुभूती नाही, तर आत्मविश्वासाचा वारसा दिला. दहावीमध्ये ६४ टक्के गुण मिळवत त्याने अभ्यासातही आपली क्षमता सिद्ध केली आहे. हेलन केलर म्हणतात, “जीवन म्हणजे धाडसी साहस, अन्यथा काहीच नाही. सूरजचा प्रवास ही त्या विचारांचीच साक्ष आहे. आजच्या काळात अनेक विद्यार्थी सहज मार्ग शोधताना दिसतात.

पण सूरजसारखे विद्यार्थी मेहनत, प्रामाणिकता आणि स्वाभिमान यांचे खरे उदाहरण ठरतात. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कॉपीमुक्त्तीचा कडक पॅटर्न राबवला जात असताना, सूरजची जिद्द सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. स्वामी विवेकानंदांचे शब्द येथे आठवतात उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. सूरजने हेच तत्व आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्या दिवशी परीक्षा हॉलमध्ये फक्त उत्तरपत्रिका भरली जात नव्हती, तर जिद्द, आत्मविश्वास आणि स्वाभिमानाची नवी व्याख्या लिहिली जात होती. पायांनी उमटलेली अक्षरे जणू धैर्याची स्वाक्षरी होती.

हे देखील वाचा : अरे बापरे! जिल्ह्यात पारा ३३ अंशांच्या पार! फेब्रुवारीतच गरमा गरम चटके; यंदा उन्हाळा तापणार

सुरज उबाळेने पेरले मनात आत्मविश्वासाचे बीज

कवी गुलजार यांच्या ओळीप्रमाणे, ‘हिम्मत की स्याही से लिखी, कहानी कभी मिटती नहीं.’ सूरजची ही कथा देखील तशीच अजरामर ठरणारी आहे. आणि म्हणूनच या प्रसंगाला अर्थ देणारा शेर पुन्हा ओठांवर येतो, “मंजिलें उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। कंधारच्या त्या परीक्षा केंद्रात त्या दिवशी एक विद्यार्थी पेपर लिहीत नव्हता; तो नव्या पिढीच्या मनात जिद्द, संघर्ष आणि आत्मविश्वासाची बीजे पेरत होता. काही कथा केवळ वाचल्या जात नाहीत. त्या अनुभवल्या जातात. सूरज उबाळेची ही कथा त्यापैकीच एक जिवंत प्रेरणा आहे.

Web Title: Suraj ubale born without arms writes his 12th standard paper using his feet nanded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • HSC Exam 2026
  • human mind
  • nanded news

संबंधित बातम्या

Railway News : नांदेड-बिदर रेल्वेमार्ग आश्वासनांपुरताच मर्यादित; विकासाचा प्रश्न की केवळ राजकारणाचा खेळ?
1

Railway News : नांदेड-बिदर रेल्वेमार्ग आश्वासनांपुरताच मर्यादित; विकासाचा प्रश्न की केवळ राजकारणाचा खेळ?

Parbhani News : परभणी रेल्वे स्थानकावर ऑपरेशन अमानत; RPF जवानाने वाचवला प्रवाशाचा जीव
2

Parbhani News : परभणी रेल्वे स्थानकावर ऑपरेशन अमानत; RPF जवानाने वाचवला प्रवाशाचा जीव

Nanded Gangwar : नांदेडचे पालकमंत्री आहेत कुठे गायब? वाढत्या गुन्हेगारीमुळे लोकांमध्ये धास्ती अन् असुरक्षितता
3

Nanded Gangwar : नांदेडचे पालकमंत्री आहेत कुठे गायब? वाढत्या गुन्हेगारीमुळे लोकांमध्ये धास्ती अन् असुरक्षितता

Nanded Crime : नांदेड हादरलं! मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या
4

Nanded Crime : नांदेड हादरलं! मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.