Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुढील दोन दिवसांत उकाड्यात वाढ होणार; येत्या दोन ते तीन दिवसांत हवामानात…

पुणे आणि परिसरात रविवारी (ता. २२) किमान आणि कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमान १८ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 22, 2026 | 12:04 PM
देशातील अनेक भागांत तापमानात वाढ; राजधानी दिल्लीत उष्णतेने 15 वर्षांचा रेकॉर्डच मोडला, पुढील 7 दिवस...

देशातील अनेक भागांत तापमानात वाढ; राजधानी दिल्लीत उष्णतेने 15 वर्षांचा रेकॉर्डच मोडला, पुढील 7 दिवस...

Follow Us
Follow Us:

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात हळूहळू वाढ होत असून, उकाड्यात देखील चांगलीच वाढ झाली आहे. तर पुढील दोन ते तीन दिवसांत हवामानात बदल होणार असून, कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शहरातील उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

शहर आणि परिसरात शनिवारी (ता. २१) किमान तापमानात किंचित वाढ होऊन ते १७.५ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. सकाळी ढगाळ वातावरण तर दुपारी कडक ऊन पडले होते. मात्र सायंकाळी हवामानात हळूहळू बदल झाला. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ढग दाटून आले. मात्र, पावसाने हजेरी लावली नाही. पुढील दोन ते तीन दिवसांत आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून, कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ होणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

पुणे आणि परिसरात रविवारी (ता. २२) किमान आणि कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमान १८ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सोमवारपासून (ता. २३) पुढील तीन दिवस कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले जाऊ शकते, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यातील अनेक भागांत तापमानात होतीये वाढ

काही दिवसांपूर्वीच, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तापमान ३८ ते ४० अंशांच्या दरम्यान राहिले होते. सोलापूर येथे ४०.१ अंश सेल्सिअस, मालेगाव येथे ४०.० अंश सेल्सिअस, ठाणे-बेलापूर औद्योगिक परिसरात ३९.८ अंश सेल्सिअस, जळगाव येथे ३९.४ अंश सेल्सिअस, परभणी येथे ३९.३ अंश सेल्सिअस अशी उष्णतेची तीव्रता नोंदवली गेली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तापमानात वाढ होताना दिसत आहे.

हेदेखील वाचा : देशातील अनेक भागांत वातावरणात बदल; विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून अंदाज

Web Title: Heat is expected to intensify over next two days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Climate Change
  • Increase in Temperature
  • Weather Update

संबंधित बातम्या

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार
1

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
2

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा
3

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

Rain Update : पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; 18 ऑगस्टपर्यंत राहणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
4

Rain Update : पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; 18 ऑगस्टपर्यंत राहणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.