Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: आनंदी आनंद गडे! पुण्याला झोडपले तर उद्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी अन्…

पुणे शहरात पुढील तीन दिवस आकाश अंशतः ते सामान्यतः ढगाळ राहील. दुपारनंतर किंवा संध्याकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 21, 2026 | 07:07 PM
Maharashtra Rain Alert: आनंदी आनंद गडे! पुण्याला झोडपले तर उद्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी अन्…
Follow Us
Follow Us:
  • पुण्यासह राज्यात पावसाचा जोर वाढला
  • घाट विभागाला पावसाचा रेड अलर्ट
  • जोरदार ते अति जोरदार पावसासह अतिवृष्टीची शक्यता 
पुणे/Pune Rain Alert: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मंगळवारी ( ता. २१) पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ वातावरण कायम असताना काही भागांत हलक्या सरी कोसळल्या. दुपारनंतर मात्र पावसाचा जोर वाढला आणि शहरासह उपनगरांत संततधार सुरू झाली. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांची काही प्रमाणात तारांबळ उडाली. दरम्यान, पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात बुधवारी (२२ जुलै) जोरदार ते अति जोरदार पावसासह अतिवृष्टीची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, वातावरणाच्या मधल्या थरातील द्रोणिका पश्चिम बंगाल-मध्य बंगालच्या उपसागरावरील चक्रीय स्थितीपासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत सक्रिय आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे पुढील दोन ते तीन दिवस कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

पुणे शहरात पुढील तीन दिवस आकाश अंशतः ते सामान्यतः ढगाळ राहील. दुपारनंतर किंवा संध्याकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच २३ जुलै रोजी घाट विभागासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मंगळवारी शहराचे कमाल तापमान २८.९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. बुधवारी किमान तापमानात किंचित घट होईल, तर कमाल तापमानात विशेष बदल होणार नसल्याचा अंदाज आहे.

Pune Rain Alert: ओढ ही पावसाची! महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण; पुण्यात काही दिवस…

(२१ जुलै, सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३०)

ठिकाण – पाऊस (मिमी मध्ये)

कुर्वंडे – ३२.० मिमी
चिंचवड – १६.० मिमी
पाषाण – १४.८ मिमी
एनडीए – १४.५ मिमी
दापोडी – १४.० मिमी
शिवाजीनगर – १२.९ मिमी
भोर – १२.५ मिमी
तळेगाव – ९.५ मिमी
माळीण – ८.५ मिमी
कोरेगाव पार्क – ८.० मिमी
हडपसर – ७.७ मिमी
दौंड – ६.० मिमी
निमगिरी – ५.० मिमी
गिरीवन – ४.० मिमी
दुदुळगाव – ३.० मिमी
राजगुरूनगर – २.० मिमी
शिरूर – १.० मिमी
बल्लाळवाडी – १.० मिमी

महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावरील आणि लगतच्या उत्तर किनारी आंध्र प्रदेशावरील चक्रीय स्थितीपासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत सरासरी समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर द्रोणी (ट्रफ) विस्तारलेली आहे. ही द्रोणी महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण गुजरात मार्गे जात असल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

Weather Update : मान्सूनचा रौद्रावतार कायम; 20 ते 26 जुलैदरम्यान अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता

गेल्या चोवीस तासांत कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यातील घाट भागात पावसाचा जोर अधिक राहिला. घाट विभागात मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांसाठी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून, हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

 

Web Title: Heavy rain in pune city red alert to ghatmatha and maharashtra weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Pune Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

Maharashtra Weather IMD Alert: राज्यात पुन्हा धो-धो कोसळणार! २२ जिल्ह्यांना येलो अलर्ट; मुंबई-ठाण्यात पावसाचा अलर्ट
1

Maharashtra Weather IMD Alert: राज्यात पुन्हा धो-धो कोसळणार! २२ जिल्ह्यांना येलो अलर्ट; मुंबई-ठाण्यात पावसाचा अलर्ट

राज्यात पावसाचे लवकरच होणार ‘कमबॅक’; 6 जिल्ह्यांत पाऊस, 20 विभागांमध्ये मुसळधारेचा इशारा
2

राज्यात पावसाचे लवकरच होणार ‘कमबॅक’; 6 जिल्ह्यांत पाऊस, 20 विभागांमध्ये मुसळधारेचा इशारा

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज
3

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात 22 सप्‍टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
4

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात 22 सप्‍टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.