Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस

पर्जन्यमानाची टक्केवारी ७९ टक्के आहे. त्यामुळे एका दिवसाच्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी हंगामातील पावसाची तूट अद्याप भरून निघालेली नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 15, 2026 | 11:13 AM
गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस

Follow Us
Follow Us:

गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात सरासरी ४७.३ मिमी पावसाची नोंद झाली. देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक १४२ मिमी, तर देसाईगंज पर्जन्यमापक मंडळात तब्बल १४५ मिमी पाऊस झाला. शंकरपूर येथेही १३९ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे दोन ठिकाणी अतिवृष्टी, तर पाच पर्जन्यमापक मंडळांत जोरदार पाऊस झाला.

जिल्ह्यातील ४५ पैकी ४५ पर्जन्यमापक मंडळांमध्ये पावसाची नोंद झाली. देसाईगंज तालुक्यापाठोपाठ कुरखेडा येथे ६४.९, गडचिरोली ५६.९, आरमोरी ५१.५, कोरची ४७, सिरोंचा ४५.२, धानोरा ४०.६, भामरागड ३५.७, अहेरी ३०.२, एटापल्ली २४.८, चामोर्शी १८.८ आणि मुलचेरा येथे १०.६ मिमी पाऊस झाला. दरम्यान, १ जूनपासून १३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत अद्याप तूट कायम आहे.

उपलब्ध पर्जन्यमान अहवालानुसार, या कालावधीत जिल्ह्यात सुमारे ९०६.२ मिमी पाऊस झाला असून, पर्जन्यमानाची टक्केवारी ७९ टक्के आहे. त्यामुळे एका दिवसाच्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी हंगामातील पावसाची तूट अद्याप भरून निघालेली नाही.

Lab Grown Diamond : भारतातच तयार होणार हिऱ्यांची संपूर्ण मूल्यसाखळी; अमित शाहांचं मोठं आवाहन, नवी मुंबईत ज्वेलरी पार्कची तयारी

दरम्यान, सप्टेंबरच्या सुरुवातीपासून पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांत खरीप पिके पाण्याच्या प्रतीक्षेत होती. रविवारी झालेल्या पावसामुळे विशेषतः धान, सोयाबीन, कापूस आणि तूर उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. ऑगस्टनंतर पावसाने उघडीप घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी उन्हाचा कडाका देखील अनुभवत आहे. असे असताना आता विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित भागांत हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

नागपूर शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस; सुरुवातीच्या काही तासांतच…

Web Title: Heavy rainfall in gadchiroli district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • Gadchiroli Rain
  • Heavy Rainfall
  • Rain News

संबंधित बातम्या

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणातही दिलासा मिळणार
1

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणातही दिलासा मिळणार

नागपूर शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस; सुरुवातीच्या काही तासांतच…
2

नागपूर शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस; सुरुवातीच्या काही तासांतच…

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह…
3

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.