महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपीट, आंबा-केळी-द्राक्ष बागांचे नुकसान
लातूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. तसेच नदीकाठच्या गावांमध्ये विशेष खबरदारी घेण्याच्या आणि सर्व अधिकाऱ्यांनी फिल्डवर राहून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस; रस्त्यांवर पाणीच पाणी, पिकांचे प्रचंड नुकसान
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव यांच्याकडून नुकसानीचा आढावा घेतला. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे त्वरित सुरू करून नुकसानीची अचूक माहिती संकलित करावी. एकाही शेतकऱ्याचे नुकसान यामधून सुटणार नाही, याची दक्षता घ्यावी.
यासोबतच घरांची पडझड, जनावरे दगवण्यासारखे प्रकार घडले असल्यास संबंधितांना त्वरित मदत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. मनुष्यहानी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घ्याव्यात. नदीकाठीच्या गावांमधे विशेष खबरदारी घ्यावी, अशा ठिकाणी पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना पालकमंत्री महाजन यांनी दिल्या.
यवतमाळमध्येही मुसळधार पाऊस
यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यात मुसळधार पावसामुळे टाकळी पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे वाहतूक बंद झाली होती. चाटवण, टाकळी, अर्जकवाकडा, सत्पल्ली, दाभा, दिग्रस, दुर्भा या गावातील व इतर गावातील शेती पाण्याखाली गेली आहे. कपाशीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले.
हातातोंडाशी आलेले पिके निसर्गाने घेतले हिरावून
हातातोंडाशी आलेले पिके निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस व जवळपास सर्वच लागवडीचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.