Photo Credit- Social media ( देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड)
राज्यातील सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या भागांत वैद्यकीय सेवेपासून वंचित असलेल्या भागातील लोकांपर्यत आरोग्य सेवा पोहचविण्याकरीता उपमुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर लोकसहभागातून सामुदायिक आरोग्य शिबिरे राबविण्यात येणार आहे. या सामाजिक आरोग्य शिबिरांचे दि.01 सप्टेंबर, 2024 रोजी प्रायोगीक तत्वावर घाटकोपर येथून उद्घाटन झाले आहे. जळगाव, चंद्रपूर जिल्हा व राज्याच्या इतर भागातही शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांना नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
40 लाख नागरिकांच्या तपासण्या
दि.01 सप्टेंबर, 2024 ते 31 ऑक्टोबर, 2024 या कालावधीमध्ये ही मोफत आरोग्य शिबिरे राज्यभर आयोजित केली जाणार आहेत. तब्बल 25 हजार आरोग्य शिबिरे या कालावधीत आयोजित केली जातील. या माध्यमातून सुमारे 40 लक्ष नागरीकांच्या तपासण्या करण्याचे ध्येय आहे. या सामाजिक आरोग्य शिबिरामध्ये विविध धर्मादाय संस्था (NGOs), मेडीकल असोसिएशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व त्यांच्याशी संल्लग्नीत खाजगी वैद्यकीय महाविद्यालये व विद्यार्थी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणीकृत रुग्णालये, समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, लोकप्रतीनिधी यांचा सहभाग असणार आहे. सामुदायिक आरोग्य शिबिरे प्रामुख्याने दलित वस्त्या, भटक्या जमातीच्या वस्त्या, आदिवासी पाडे, झोपडपट्ट्या या भागांत राबविण्यात येणार असून सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत. रामेश्वर नाईक हे या शिबिर आयोजन कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक आहेत.
शिबिरामध्ये खालील बाबींचा समावेश आहे.
शिबिरांचे स्वरुप :