हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस, ६० रस्ते बंद
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसाने पुन्हा रौद्ररुप दाखविले. अमरावती जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी धुवांधार पावसाचे आगमन झाल्याने पुन्हा जनजीवन विस्कळीत झाले होते. आता आगामी सण-उत्सवाच्या काळात सुसाट वाऱ्यासह पावसाचे संकेत हवामान खात्याने दिले आहे.
हेदेखील वाचा : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ‘रेड अलर्ट’; जळगाव जिल्ह्याला पावसाने पुन्हा झोडपले
हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, जगदलपूरच्या दक्षिणेस असलेले डिप्रेशन (वादळ) उत्तर पश्चिम दिशेने वाटचाल करत असून, सोमवारी (दि.2) हे वादळ विदर्भाला पार करण्याची शक्यता आहे. तसेच त्याची तीव्रता सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मान्सूनच्या आसाची पूर्वेकडील धुरा दक्षिणेस सरकली आहे. या सर्व परिस्थितीमुळे विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अमरावती रेड अलर्ट
अमरावती जिल्ह्यात 2 सप्टेंबर रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अकोला बुलढाणा, वाशीम, वर्धा, नागपूर जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. यासोबतच उर्वरित विदर्भात गडगडाटासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. मंगळवारी (दि.3) संपूर्ण विदर्भात सार्वत्रिक स्वरूपात बहुतेक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची गडगडाटासह शक्यता आहे.
विदर्भात बरेच ठिकाणी पाऊस
बुधवारी (दि. 4) अमरावतीसह पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित विदर्भात बरेच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 5 ते 7 सप्टेंबरदरम्यान विदर्भात बरेच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली.
सण-उत्सवाच्या काळात हजेरी
ऑगस्टमध्ये विश्रांती घेतलेला पाऊस सप्टेंबरमध्ये चांगलाच सक्रीय झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. तर, सप्टेंबर महिन्यात देशभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून, या काळात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे.
हेदेखील वाचा : गुजरातमध्ये पावसाचा अक्षरश: कहर; आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू तर 17,800 जणांना सुरक्षितस्थळी हलवले