Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्याला मुसळधार पावसाने झोडपले; मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र अतिमुसळधार पाऊस, आता पुढील 48 तास…

हिंगोली, अहिल्यानगरलाही पावसाने झोडपून काढले. हिंगालीत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने चार दिवसांपासून 10 गावांचा संपर्क तुटला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 16, 2025 | 07:22 AM
राज्याला मुसळधार पावसाने झोडपले; मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र अतिमुसळधार पाऊस, आता पुढील 48 तास...

राज्याला मुसळधार पावसाने झोडपले; मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र अतिमुसळधार पाऊस, आता पुढील 48 तास...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होत आहे. तर मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस होताना दिसत आहे. रविवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने दैना उडवली असून, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह कोकणपट्ट्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. तसेच पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हिंगोली, अहिल्यानगरलाही पावसाने झोडपून काढले. हिंगालीत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने चार दिवसांपासून 10 गावांचा संपर्क तुटला, तर आष्टी-पाथर्डी तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला असून, 30 गावांचा संपर्क तुटला आहे. धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 42 महसूल मंडळांपैकी 24 मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली असून, आतापर्यंत अडीच लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत.

हेदेखील वाचा : Monsoon Update: मुंबई पुन्हा पाण्यात, पावसाची संततधार; महाराष्ट्र-दिल्लीचे वातावरण, मोनोही अडकली

दरम्यान, शेताबरोबरच गावातील घरांमध्येही पाणी शिरल्याने अनेकांना संसार उघड्यावर मांडण्याची वेळ आली आहे. परंडा महसूल मंडळासह धाराशिव तालुक्यातील तेरसह परिसरात जोरदार पावसामुळे तेरणा नदी तुडुंब भरून वाहत आहे. या नदीकाठावरील कामेगाव, बोरगाव राजे, बोरखेडा, सांगवी, दाउतपूर, ईर्ला, समुद्रवाणी आदी गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तूर, खरीपासर इतर धान्यावर परिणाम

सोयाबीन, मूग, उडीद, मका आणि तूर या खरीप पिकांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील 5 लाख 54 हजार हेक्टर क्षेत्रापैकी सर्वाधिक पेरणी सोयाबीनची असून सोयाबीन भिजून खराब झाले आहे. शेतात पाणी साचल्याने उभे सोयाबीन पीक नासण्याची भीती आहे. कामेगाव, बोरगाव राजे, सांगवीसह गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईतील अनेक भागांत साचलं पाणी

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. रविवारी रात्री उशिरापासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. त्यातच आता मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले. सकाळी किंग्ज सर्कल परिसरातील रस्ते कालव्यांसारखे दिसत होते. त्याच वेळी मुंबईच्या वडाळा परिसरात तांत्रिक बिघाडामुळे एक मोनोरेल थांबली. त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला.

Web Title: Heavy rains in maharashtra north maharashtra including marathwada received heavy rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 07:14 AM

Topics:  

  • Climate Change
  • Heavy Rain
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

Green Energy Maharashtra: अपारंपरिक ऊर्जेचा वाटा २० टक्केच! ऊर्जा वापर वाढतोय, हरित भविष्य धोक्यात? महाराष्ट्राचं कठोर वास्तव
1

Green Energy Maharashtra: अपारंपरिक ऊर्जेचा वाटा २० टक्केच! ऊर्जा वापर वाढतोय, हरित भविष्य धोक्यात? महाराष्ट्राचं कठोर वास्तव

Weather Update : हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरसह अनेक राज्यात थंडीची लाट; तापमानाचा पारा शून्यापेक्षाही खाली
2

Weather Update : हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरसह अनेक राज्यात थंडीची लाट; तापमानाचा पारा शून्यापेक्षाही खाली

Weather Update : उत्तराखंड, पंजाबसह जम्मू-काश्मीरमध्ये थंडीचा वाढला कडाका; डोंगराळ भागात बर्फवृष्टी
3

Weather Update : उत्तराखंड, पंजाबसह जम्मू-काश्मीरमध्ये थंडीचा वाढला कडाका; डोंगराळ भागात बर्फवृष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.