
फोटो सौजन्य: Gemini
भागवत मोहनकुमार मगर (वय २४, रा. जेऊर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते शेतात पिकाला पाणी देत असताना शेजारील घरातील कचरा शेतात टाकल्याने वाद निर्माण झाला. या वादातून मन्नू अलीम कुरेशी, सत्तार (मुडा) इस्माईल शेख आणि मुनीर खैरू शेख यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
सोलापुरात सत्तेतील मित्र पक्षांनी मारली विजयाची बाजी; कुणाला किती जागा मिळाल्या?
या घटनेनंतर गावातील बाजार समितीचे संचालक व माजी सरपंच मधुकर मगर, दीपक तवले तसेच अन्य दहा ते बारा नागरिक घटनास्थळी जमा झाले. मध्यस्थी करून समजावण्याचा प्रयत्न सुरू असतानाच परिस्थिती चिघळली, अशी माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी मन्नू अलीम कुरेशी, सत्तार (मुडा) इस्माईल शेख, मुनीर खैरू शेख, इन्नू अलिम शेख, जिलानी नजीम शेख, सकलेम सत्तार शेख, कादिर अब्दुल शेख, सलीम अकबर शेख, इंद्रीस मुनीर शेख, दस्तगीर करीम शेख आणि वाहप रशीद पठाण (सर्व रा. जेऊर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात एका महिलेनेही स्वतंत्र फिर्याद दिली असून, घराशेजारील शेतात कचरा टाकल्याच्या कारणावरून भागवत मगर व अनिल मगर यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तिने केला आहे. पोलिसांकडून दोन्ही बाजूंच्या तक्रारींचा तपास सुरू आहे.