Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यापुढे राज्याच्या सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या हस्ते करणार : मंत्री सुधीर मुनगंटीवार

संपूर्ण देश भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. याच निमित्ताने येत्या २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी उपस्थित राहावे असा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  • By Sunil Chavan
Updated On: Sep 14, 2022 | 09:51 PM
Criticism is the only program of the Chief Minister - BJP leader Sudhir Mungantiwar's attack

Criticism is the only program of the Chief Minister - BJP leader Sudhir Mungantiwar's attack

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – सांस्कृतिक कार्य विभागामार्फत अनेक पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार राजकारण्यांच्या हस्ते देण्याऐवजी पद्म पुरस्कारप्राप्त मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांचे कुटुंबिय यांच्या हस्ते राज्याची शान असलेल्या या सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण करण्यात यावे, असे निर्देश आज सांस्कृतिक मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य विभागाला दिले. सह्याद्री अतिथीगृहात आज झालेल्या सांस्कृतिक खात्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

संपूर्ण देश भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. याच निमित्ताने येत्या २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी उपस्थित राहावे असा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

येत्या २ ऑक्टोबर रोजी नदी महोत्सवाचाही शुभारंभ होत असून यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. याशिवाय दिवाळीनिमित्त ६ महसूली विभागात दिवाळी पहाट आयोजित करण्याचे नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.पंढरपूर येथे राज्यस्तरीय किर्तनकार प्रवचनकार संमेलन घेण्यात येणार

समाजातील प्रत्येकाचे वेगवेगळया स्वरुपात प्रबोधन करण्याचे काम किर्तनकार, प्रवचनकार करत असतात. या सर्वांना एकत्र करुन लवकरच किर्तनकार प्रवचनकारांचे संमेलन पंढरपूर येथे आयोजित करण्यात यावे अशा सूचनाही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

ना.श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी विभागामार्फत वेगवेगळया समित्या नियुक्त करण्यात येतात. या सर्व नियुक्त्यांचे एक बुकलेट तयार करणे आवश्यक आहे.तसेच या समित्यांमध्ये नियुक्त करण्यात येणाऱ्या अशासकीय सदस्यांची निवड कोणत्या निकषाच्या आधारे करण्यात येते हे निकषही तयार करणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात या विभागाची दर दोन महिन्यांनी विस्तृत बैठक घेण्यात येईल आणि या बैठकीमध्ये या सगळया बाबींचा आढावा घेण्यात येईल.

पुरस्कार वितरणाचे वेळापत्रक ठरवा
सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखाली अनेक संचालनालय येतात. या संचालनालयामार्फत आणि विभागामार्फत दरवर्षी काही पुरस्कार देण्यात येतात. हे सर्व पुरस्कार वितरणांचे एक वेळापत्रक ठरवून दि. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या काळातच ते पुरस्कार त्याच दिवशी वितरीत होतील असे नियोजन करण्यात यावे असेही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. राज्यात असलेल्या ५२ नाटयगृहांचे अत्याधुनिकीकरण आणि सुशोभीकरणावर भर देण्यात यावा. त्यासंदर्भातील वेळापत्रक तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी विभागाला यावेळी दिले. ही सर्व नाट्यगृहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मुंबईत मंत्रालय आणि रवींद्र नाट्य मंदिराशी जोडली जातील असेही त्यांनी सांगितले. याशिवाय राज्यात असलेल्या विविध भजनी मंडळाची नोंदणी करण्यासाठी एक स्वतंत्र ॲप विभागाने विकसित करावे अशा सूचनाही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

आज सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक‍ .बिभीषण चवरे, पुराभिलेख संचालक सुजीत उगले, पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गे, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Henceforth state cultural awards will be distributed by padma awardees minister sudhir mungantiwar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2022 | 09:51 PM

Topics:  

  • BJP
  • Padma award
  • Sudhir Mungantiwar

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.