HSRP Issue : 15 ऑगस्टनंतरही 'या' वाहनांवर लागणार नाही दंड; कारणही आहे तसंच...
मुंबई : राज्याच्या परिवहन विभागाकडून 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक केले आहे. यासाठी यापूर्वी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारने आता तिसरी मुदतवाढ दिली आहे. या जुन्या वाहनांना एचएसआरपी बसवण्याची प्रक्रिया १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करता येणार आहे. असे असताना आत्तापर्यंत राज्यातील 23 लाख वाहनांना ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवण्यात आल्या आहेत.
सध्या मुंबई महानगरातील 10 लाख वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लागली असून, 40 लाख ऑनलाईन अर्ज परिवहन विभागाकडे केले आहेत. राज्यात सुमारे दोन कोटी जुनी वाहने आहेत. त्यात राज्यातील प्रादेशिक-उपप्रादेशिक 60 परिवहन कार्यालयांची तीन मंडळांत विभागणी केली आहे. तीन मंडळांसाठी मेसर्स रोजमर्टा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड, मेसर्स रियल मेजॉन इंडिया लिमिटेड, मेसर्स एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड अशा तीन कंपन्यांची निवड केली आहे. दरम्यान, 15 ऑगस्टनंतर मात्र ‘एचएसआरपी’ नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत सुमारे 23 लाख जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ प्लेट्स बसवण्यात आले आहेत. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत असलेल्या वाहनांसाठी HSRP बसवणे अनिवार्य आहे. हा नियम दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनांसाठी लागू करण्यात आला आहे, मग ते खाजगी असो वा व्यावसायिक.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय?
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) ही अॅल्युमिनियमपासून तयार केलेली विशेष प्रकारची नंबर प्लेट असते. यात एक युनिक क्रमांक, होलोग्राम आणि लेसरने कोरलेला खास कोड असतो. यासोबत एक रंगीत स्टिकरही लावले जाते, ज्यामध्ये वाहनाची माहिती दिली जाते. जसे इंधनाचा प्रकार, नोंदणी क्रमांक, नोंदणीची तारीख इत्यादी. अशा प्रकारची प्लेट गाडी चोरीला गेल्यास तिचा मागोवा घेण्यासाठी खूपच उपयुक्त ठरते.
ऑफिशियल वेबसाइटवर जावा : HSRP बुक करण्यासाठी, तुम्हाला वाहन उत्पादकाच्या (OEM) अधिकृत वेबसाइट (https://bookmyhsrp.com/) ला भेट द्यावी लागेल.
राज्य आणि वाहन प्रकार निवडा : वेबसाइटला भेट दिल्यानंतर, प्रथम तुमचे राज्य निवडा आणि नंतर वाहनाचा प्रकार (दुचाकी किंवा चारचाकी) निवडा.
वाहनाची माहिती भरा : यानंतर, तुम्हाला तुमच्या वाहनाचे आरसी नंबर, इंजिन नंबर आणि चेसिस नंबर सारखे तपशील काळजीपूर्वक भरावे लागतील. ही सर्व माहिती तुमच्या नोंदणी प्रमाणपत्रावर (RC) दिलेली आहे.
फिटमेंटचे स्थान आणि स्लॉट निवडा : तुम्हाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची डिलिव्हरी कुठे पाहिजे आहे याची माहिती भरा व तारीख आणि टाइम स्लॉट निवडा.
पेमेंट करा: नंतर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने फी भरावी लागेल. साधारणपणे दुचाकींसाठी 300 ते 400 रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी 500 ते 600 रुपये शुल्क आकारले जाते.
बुकिंग पावती मिळवा : हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी पैसे भरल्यानंतर, तुम्हाला एक पावती मिळेल, जी तुम्ही प्रिंट करू शकता किंवा PDF म्हणून सेव्ह करू शकता. जेव्हा तुम्ही ही नंबर प्लेट लावायला जाल तेव्हा तुम्हाला ही पावती दाखवावी लागेल.