Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल संशयास्पद? EVM च्या याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजल्यानंतर झालेल्या मतदानावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. याविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 03, 2025 | 08:54 PM
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल संशयास्पद? EVM च्या याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल संशयास्पद? EVM च्या याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Follow Us
Follow Us:

Prakash Ambedkar: महाराष्ट्र विधानसभेचा निकाल मागच्या वर्षी जाहीर झाल्यापासून विरोधक या निकालावर शंका घेत आहेत. ईव्हीएममध्ये फेरफार असल्याचे आरोप केले जात आहेत. महाविकास आघाडीला त्यांचा झालेला पराभव मान्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. विरोधक ईव्हीएमवर आक्षेप घेताना दिसून येत आहेत. याबबात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत नेमके काय काय घडले आहे ते जाणून घेऊयात.

विधानसभा निवडणुकीत महायुतीचा जोरदार विजय झाला. 200 पेक्षा जास्त जागा जिंकत महायुतीने राज्यात प्रचंड मोठ्या बहुमताने सरकार स्थापन केले आहे. मात्र अनेकांनी या निकालावर संशय व्यक्त केला. ईव्हीएममध्ये फेरफार याबाबत हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आज सुनावणी पार पडली. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजल्यानंतर झालेल्या मतदानावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. याविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याच्या वाजुने वकील प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली. त्यांनी ईव्हीएमबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात युक्तीवाद केला. निवडणूक आयोगाने नियमांचे पालन केले नाही असा युक्तीवाद करण्यात आला.

हेही वाचा: EVM Machine : विधानसभेचा निकाल संशयाच्या भोवऱ्यात! महाविकास आघाडीबरोबर मनसेला देखील EVMवर संशय

विधानसभेचा निकाल संशयाच्या भोवऱ्यात

राज्यामध्ये विधानसभा निवडणूका झाल्या असल्या तरी राजकारण रंगले आहे.  महायुतीला न भूतो न भविष्यती असा विजय मिळाला आहे. 288 जागांपैकी 230 जागांवर महायुतीने विजय मिळवला. पण आता या निकालावर संशय व्यक्त केला जात असून ईव्हीएम मशीनवर संशय घेतला जात आहे.

हेही वाचा: EVM Machine: “ईस्त्रायली कंपनीच्या माध्यमातून मतदान यंत्रात…”; प्रशांत जगतापांचा मोठा आरोप

यंदाची निवडणूक ही महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. अटीतटीचा सामना होण्याची शक्यता असताना एकतर्फी निकाल हाती आला आहे. राज्यामध्ये भाजपला तब्बल 132 जागा मिळाल्या आहेत. तर शिंदे गटाला 57 आणि अजित पवार गटाला 41 जागांवर विजय मिळाला आहे. महायुतीच्या या अफाट यशामुळे विरोधी पक्षनेता पदावर दावा देखील करण्यात महाविकास आघाडीच्या कोणत्याच पक्षाला शक्य झाले नाही. त्यामुळे मविआने ईव्हीएम घोटाळ्याचा मुद्दा ऐरणीवर आणत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यानंतर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर आज सुनावणी पार पडली आहे.

Web Title: Highcourt heaing at against evm machine maharashtra assembly election court issued notice to election comission marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 08:19 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly Election
  • Mahavikas Aghadi
  • Mumbai High Court
  • Prakash Ambedkar

संबंधित बातम्या

Maharashtra Badminton Association च्या अध्यक्षपदी अरुण लखानी, तर सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड
1

Maharashtra Badminton Association च्या अध्यक्षपदी अरुण लखानी, तर सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.