Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! डिझेल नसल्याचे सांगून गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारली; बाळाचा पोटातच मृत्यू

हिंगोली जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर येत नसून रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे कारण सांगून गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारण्यात आली. याचदरम्यान बाळाचा महिलेच्या पोटातच मृत्यू झाला.

  • By विवेक
Updated On: May 28, 2026 | 07:23 PM
pregnent women loses baby after ambulance denied over no diesel, Hingoli, Hingoli news,

pregnent women loses baby after ambulance denied over no diesel, Hingoli, Hingoli news,

Follow Us
Follow Us:

हिंगोली जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर येत नसून रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे कारण सांगून गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारण्यात आली. रुग्णवाहिकेअभावी संबंधित महिलेला दोन तास ताटकळत ठेवण्यात आले होते. याचदरम्यान बाळाचा महिलेच्या पोटातच मृत्यू झाला. अतिशय धक्कादायक अशी हि घटना असून देशातील इंधन तुटवड्याच्या भीषण परिस्थितीचे वास्तव यामुळे समोर आले आहे. अतिशय दुःखद अश्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत असून परिसरात दुःखद वातावरण झाले आहे.

नेमके काय घडले?

हिंगोली जिल्ह्यातील मनीषा इंगळे यांच्यासोबत हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. जवळा बाजार आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. महिलेच्या नातेवाईकांनी तातडीने १०८ या क्रमांकावर फोन केला असता अँब्युलन्समध्ये डिझेल नसल्याचे कारण सांगून गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारण्याचा प्रकार हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार आरोग्य केंद्रात घडला आहे. रुग्णवाहिकेअभावी संबंधित महिलेला तब्बल दोन तास ताटकळत ठेवण्यात आले होते. यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिका बोलवून महिलेला हिंगोलीच्या शासकीय रुग्णालायत नेले. मात्र वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने महिलेला त्रासाला सामोरे जावे लागले आणि याचदरम्यान बाळाचा महिलेच्या पोटातच मृत्यू झाला.

या धक्कादायक प्रकारानंतर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालायने मात्र हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. रुग्णवाहिकेत डिझेल उपलब्ध होतं मात्र चालक उपलब्ध नव्हता असे भलतेच कारण त्यांनी दिले. मात्र आता माध्यमांमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र त्यांनी चार जणांची चौकशी समिती नेमली आहे. या गंभीर प्रकारानंतर राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांनी याची दाखल घेत या प्रकारात सखोल चौकशी करत कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. तर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ‘डिझेलउपलब्ध नसल्यास आणि आरोग्य अधिकारी दोषी असल्यास’ कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

Nurses Protest: नर्सेसच्या बदल्यांवरून वाद; ‘हा फक्त नियमांचा नव्हे तर मानवी… ’; बदल्यांवर अधिकाऱ्यांचे मत

अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आवाहन करत इंधनाचा कमी वापर करण्याचे वाहन केले होते. त्यानंतर देशभरात इंधन तुटवड्याच्या भीतीमुळे आणि अफवांमुळॆ इंधन खरेदीसाठी नागरिकांनी मोठी झुंबड केली. महाराष्ट्रात काही जिल्ह्यात याचे भीषण वास्तव पाहायला मिळाले. अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांनी कॅन आणि बाटल्या घेऊन पेट्रोल डिजेलसाठी मोठी गर्दी केली. अनेक ठिकाणी हाणामारीच्या घटना झाल्याचे समोर आले. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरमध्ये टाकण्यासाठी देखील इंधन उपलब्ध नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. अश्यातच दुसरीकडे मात्र इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसून आली. अश्यातच हिंगोलीमधील गरोदर महिलेसोबत झालेल्या दुर्दैवी प्रकारानंतर परिस्थिती किती गंभीर झाली असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Palghar Accident News: पालघर अपघातात १३ जणांचा मृत्यू; वारसांना ५ लाखांची शासकीय मदत घोषित

Web Title: Pregnent women loses baby after ambulance denied over no diesel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • Hingoli
  • Hingoli News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.