Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील पोलिसांवर केंद्रीय गृहमंत्र्यांचा विश्वास नाही; असं का म्हणाले संजय राऊत?

शरद पवार गटाचे जेष्ठ नेते व राज्यसभा खासदार शरद पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या गृहखात्याकडून याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रात व राज्यात भाजप सरकार असताना देखील याप्रकारचा निर्णय घ्यावा लागत असल्यामुळे महायुतीवर महाविकास आघाडीने निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 23, 2024 | 12:56 PM
शरद पवारांची सुरक्षा वाढवल्याने संजय राऊत आक्रमक

शरद पवारांची सुरक्षा वाढवल्याने संजय राऊत आक्रमक

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  राज्यामध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. एका बाजूला राज्यात निवडणूकासाठी वातावरण निर्मिती सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला बदलापूर अत्याचार प्रकरणामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर राज्यात आरक्षणावरुन मोर्चे आणि आंदोलनं सुरु आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार व जेष्ठ नेते शरद पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. या सुरक्षेवरुन खासदार संजय राऊत यांनी राज्यातील सरकारला टोला लगावला आहे.

शरद पवार यांना वाढीव सुरक्षा

केंद्रीय गृहमंत्रालयाने जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत निर्णय घेतला आहे. शरद पवार यांना आता झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्रातून घेण्यात आला आहे. शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक आणि शरद पवारांना मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा पुरविल्याचे सांगितले जात आहे. या मुद्द्यावरुन संजय राऊतांनी राज्य व केंद्र सरकारला घेरले आहे. मध्यमांशी संवाद साधताना त्यांनी टोला लगावला आहे. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे. तरी देखील केंद्राला शरद पवार यांना वाढीव सुरक्षा द्यावी लागते, म्हणजे केंद्राला राज्य सरकारवर विश्वास नाही का? या आशयाचा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, ”केंद्र सरकारकडून शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. खरंतर ज्याची गरज नाही. याचा अर्थ महाराष्ट्रातील पोलिसांवर केंद्रीय गृहमंत्र्यांचा विश्वास नाही. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते विशेषतः अशावेळी जेव्हा महाराष्ट्रात त्यांचाच राज्य आहे, याचा अर्थ महाराष्ट्राचे पोलीस जसं आमच्या मुलींचे रक्षण करू शकत नाही, त्याच पद्धतीने आमच्या प्रमुख नेत्यांचंही रक्षण करू शकत नाही. यावर आता केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केला आहे. तसेच तुमचे पोलीस आणि तुमची यंत्रणा कुचकामी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे.

पोलीस खातं हे भ्रष्टाचारानं बरबटलेलं

पुढे त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था कमकुवत असल्याची टीका केली. तसेच वरिष्ठांची नियुक्ती ही संघप्रवृत्ती पाहून केली असल्याची टीका केली. खासदार राऊत म्हणाले, “राज्याच्या पोलीस महासंचालक या महिला आहेत, त्या जर जाहीरपणे सांगत असतील की मी संघाची कार्यकर्ता आहे तर अशा व्यक्तीकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकता? या राज्यातल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या ज्याप्रमाणे नेमणूक झाल्या आहेत, त्यांची पार्श्वभूमी संघ परिवाराशी संबंधित आहे का? हे बघूनच त्यांना वरिष्ठ पदावर नेमणूक देण्यात आली आहे. त्यामुळे इतर पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. राज्यातील पोलीस खातं हे भ्रष्टाचारानं बरबटलेलं आहे. कारण पैसे दिल्याशिवाय बढती आणि भरती होत नाही, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Web Title: Home minister amit shah does not trust maharashtra police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 12:56 PM

Topics:  

  • Amit Shah
  • sanjay raut

संबंधित बातम्या

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध
1

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले
2

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले

130th Amendment Bill 2025: पंतप्रधानांपासून नगरसेवकांपर्यंत द्यावा लागणार राजीनामा; संसदेत सादर होणार ‘हे’ नवे विधेयक
3

130th Amendment Bill 2025: पंतप्रधानांपासून नगरसेवकांपर्यंत द्यावा लागणार राजीनामा; संसदेत सादर होणार ‘हे’ नवे विधेयक

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.