Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Election 2026: किरीट सोमय्यांचे महाराष्ट्रविरोधी मनसुबे उघड; संजय राऊतांनी तोफ डागली

किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत घेतलेल्या भूमिका सातत्याने महाराष्ट्रविरोधी राहिल्या आहेत. शालेय शिक्षणात मराठी भाषेला विरोध करण्याची भूमिकाही त्यांनी घेतली होती

  • By anuradha sagar
Updated On: Jan 04, 2026 | 01:42 PM
Sanjay Raut statement, Kirit Somaiya controversy,

Sanjay Raut statement, Kirit Somaiya controversy,

Follow Us
Follow Us:
  • किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या हे मुलुंडमधील वार्ड क्रमांक 107 मधून निवडणूक रिंगणात
  • राष्ट्रवादीचा उमेदवारी अर्ज बाद
  • नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर
BMC Election 2026: शिवसेना ठाकरे गटाचे कट्टर विरोधक आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या हे मुलुंडमधील वार्ड क्रमांक 107 मधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे नील सोमय्या यांच्या विरोधात सुरुवातीला शिवसेना ठाकरे गटाकडून कोणताही अधिकृत उमेदवार देण्यात आलेला नव्हता, त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते.

वार्ड क्रमांक 107 ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना देण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादीचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून नील सोमय्या यांच्या विरोधात ठाकरे गट पुरस्कृत उमेदवार देण्यात आल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Ram Rahim Singh parole : ही शिक्षा आहे की सहल? राम रहिम पुन्हा ४० दिवसांच्या पॅरोलवर बाहेर, हरियाणा सरकारची मंजूरी

संजय राऊत म्हणाले की, किरीट सोमय्या हे केवळ आमचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे कट्टर विरोधक आहेत. ते महाराष्ट्र आणि मराठीविरोधी भूमिका घेत आले असून, महाराष्ट्राचे शत्रू आहेत. भाजपकडून अशा महाराष्ट्रविरोधी व्यक्तींना निवडणुकीच्या मैदानात उतरवले जात असल्याने पक्षाचे मनसुबे स्पष्ट झाले आहेत. किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत घेतलेल्या भूमिका सातत्याने महाराष्ट्रविरोधी राहिल्या आहेत. शालेय शिक्षणात मराठी भाषेला विरोध करण्याची भूमिकाही त्यांनी घेतली होती. त्या संदर्भात ते उषा मेहता यांच्यासोबत न्यायालयातही गेले होते, असा दावा राऊत यांनी केला.

BMC Election 2026: नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत होणारच

 

संजय राऊत पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून जागावाटपात प्रभाग क्रमांक 107 ची मागणी केली होती. प्रभाग 107 खूप संवेदनशील आहे. ती जागा आम्ही लढणे महत्त्वाचे आहे आमच्याकडे चांगले उमेदवार असल्याचे राष्ट्रवादीने सांगितले होते. आपण सगळे मिळून ती जागा जिंकू, त्यामुळे नाईलाजाने आम्ही ती जागा त्यांच्याकडे दिली. शरद पवार यांच्या एका कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागे उभे राहाण्याचे आम्ही सगळ्यांनी ठरवले. पण नेहमीप्रमाणे प्रभाग क्र 107 मध्ये बिनविरोध घोटाळा झाला.

त्यानंतर मुलुंडचे नाXX पोपटलाल बिनविरोध, बिनविरोध, माझ्याविरुद्ध कोणी नाही, असे करत नाचायला लागले. पण राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सोडल्यानंतर आमचे शिवसैनिक दिनेश जाधव यांनी आपला अर्ज तिथे भरून ठेवला आहे. त्यांचा अर्ज कायम आहे. उद्धव ठाकरे यांनी दिनेश जाधव हे अधिकृतपणे शिवसेना पुरस्कृत उमेदवार असल्याचे पत्र दिलं आहे. त्यामुळे आता तिथे नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत होणार आहे. दिनेश जाधव यांना फक्त मशाल चिन्ह न मिळाल्याने ते ‘दूरदर्शन संच’ या चिन्हावर लढतील. या ठिकाणी काटे की टक्कर होणार आहे. नील सोमय्या बिनविरोध येऊ शकत नाही. त्यांना आमच्या शिवसेनेशी लढावेच लागणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला.

Web Title: Kirit somaiya is an enemy of maharashtra bjps anti maharashtra agenda exposed sanjay raut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • BJP
  • kirit somaiya
  • Maharashtra Politics
  • sanjay raut
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

‘देर आए दुरुस्त आए’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याचा घरचा आहेर,
1

‘देर आए दुरुस्त आए’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याचा घरचा आहेर,

Viral Video : हरिभक्तांच्या गर्दीत मोदीभक्त! विठ्ठलाच्या नगरीत पंतप्रधानांची पूजा; चक्क चंद्रभागेत घातले स्नान
2

Viral Video : हरिभक्तांच्या गर्दीत मोदीभक्त! विठ्ठलाच्या नगरीत पंतप्रधानांची पूजा; चक्क चंद्रभागेत घातले स्नान

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात
3

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात

Sanjay Raut on Dharmendra Pradhan: आता नवीन शिक्षणमंत्री कोण होणार? संजय राऊत यांनी थेट नावच सांगितलं…
4

Sanjay Raut on Dharmendra Pradhan: आता नवीन शिक्षणमंत्री कोण होणार? संजय राऊत यांनी थेट नावच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.