मुंबई – सध्या महाराष्ट्र व कर्नाटक (Maharashtra Karnatak) या दोन राज्यातील सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. मंगळवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा कर्नाटकमध्ये कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेची जाळपोळ केली. यानंतर मांगुर हुपरी मार्ग, संकेश्वर हिटणी, गणेशवाडी कागवाड, अप्पाचीवाडी, रायबाग तालुक्यातील गायकनवाडी आणि खानापूर येथे तपासणी नाक्यावर पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला आहे.
[read_also content=”आता विमानतळावर लवकर पोहचा नाहीतर…विमान प्राधिकरणाची ‘ही नवीन’ नियमावली जाहीर https://www.navarashtra.com/maharashtra/now-reach-the-airport-early-or-else-this-new-regulation-of-the-aviation-authority-has-been-announced-352118.html”]
सीमा वादाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असून, ठिकठिकाणी आंदोलन करत कर्नाटक सरकारचा (Karnatak government) निषेध करण्यात येत आहे. तर लोकांच्या संतप्त भावना व प्रतिक्रियांचा आगडोंब उसळला आहे. दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारवर सीमाप्रश्नी कोणतीच भूमिका घेत नाही, म्हणून त्यांच्यावर टिका होत आहे. दरम्यान, संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात देखील सीमाप्रश्नी मुद्दा उपस्थित केला जात आहे. तसेच सभागृहात मविआच्या खासदारांनी (MVA MP) सभागृहात सीमाप्रश्न उचलून धरत या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी (Amit Shah) यात मध्यस्थी करुन या प्रश्न मार्गी लावावा असं म्हटलं आहे. तसेच दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांना एकत्र बसवून चर्चा करुन त्यातून मार्ग काढावी अशी मागणी मविआच्या खासदारांनी अमित शहांकडे केली होती. त्यानंतर या प्रश्नी अमित शहा मध्यस्थी करणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) दिली आहे. त्यामुळं लवकरच सीमाप्रश्नी अमित शहा दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.