Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्याच्या रुबी हॉलमध्ये उपचार सुरू

बारामतीतील 'गोविंदबाग' निवासस्थानी असताना त्यांना अचानक खोकला आणि कफचा त्रास (Chest Congestion) सुरू झाला होता. डॉक्टरांच्या पथकाने घरी तपासणी केल्यानंतर त्यांना तातडीने पुण्यात हलवण्यात आले होते.

  • By अनुराधा धावडे
Updated On: Feb 22, 2026 | 02:33 PM
Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्याच्या रुबी हॉलमध्ये उपचार सुरू
Follow Us
Close
Follow Us:
  • शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना सलाईन लावण्यात आले आहे.
  • गेल्या आठवड्यात त्यांना छातीत कंजेशन (Chest Congestion) आणि खोकल्याचा त्रास झाला होता
  • डॉ. परवेझ ग्रँड आणि डॉ. अभिजीत लोढा यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
 

Sharad Pawar Health news: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. शरद पवार यांना पुन्हा एकदा पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. शरद पवार यांना गेल्या आठवड्यातही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खोकला आणि कफामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. पण आज सकाळी पुन्हा अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आधीच दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, आता शरद पवारांच्या प्रकृतीबाबतच्या बातमीने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती खालावली; बारामतीहून पुण्याच्या दिशेने रवाना

 

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार (Sharad Pawar) यांना काहीसा अशक्तपणा जाणवू लागला, त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळीही कमी झाल्याने त्यांना पुन्हा एकदा रूबी हॉलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे. अशक्तपणा वगळल्यास त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार बराच काळ बारामतीत होते. सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले होते. त्याचदरम्यान त्यांची प्रकृती बिघडली होती. या दुःखद घटनेमुळे आणि सततच्या धावपळीमुळे त्यांच्या प्रकृतीवर ताण पडल्याचे बोलले जात आहे.

बारामतीतील ‘गोविंदबाग’ निवासस्थानी असताना त्यांना अचानक खोकला आणि कफचा त्रास (Chest Congestion) सुरू झाला होता. डॉक्टरांच्या पथकाने घरी तपासणी केल्यानंतर त्यांना तातडीने पुण्यात हलवण्यात आले होते. यापूर्वी ते पाच दिवस रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
घरी विश्रांती घेत असताना आज पुन्हा अशक्तपणा जाणवू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्यात हेमोफिलिया रुग्णांकडे दुर्लक्ष! ५,५०० रुग्णांचे आयुष्य ‘क्लॉटिंग फॅक्टर’ वर रुग्णांना हवी आहे बजेटमध्ये भरीव तरतूद

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा प्रकृतीच्या कारणास्तव पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने (Dehydration) त्यांना मोठ्या प्रमाणावर अशक्तपणा जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना सध्या सलाईन लावण्यात आले आहे. अशक्तपणा आणि थकवा वगळता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात येत आहे. राज्याच्या राजकारणातील ‘आधारवड’ मानले जाणाऱ्या शरद पवारांना लवकर आराम मिळावा, यासाठी राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रार्थना करत आहेत. रुग्णालयाबाहेर सध्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

 

Web Title: Sharad pawars health deteriorates treatment underway at ruby hall in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Sharad Pawar
  • supriya sule

संबंधित बातम्या

शरद पवार राजकारणात पुन्हा ‘ॲक्टिव्ह’; राष्ट्रवादीतील फूट आता थांबणार?
1

शरद पवार राजकारणात पुन्हा ‘ॲक्टिव्ह’; राष्ट्रवादीतील फूट आता थांबणार?

Sharad Pawar: “मुंबईत रंगला शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर; शरद पवार आणि खासदार नीलेश लंकेंची ‘आपला मावळा’साठी मोठी घोषणा!
2

Sharad Pawar: “मुंबईत रंगला शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर; शरद पवार आणि खासदार नीलेश लंकेंची ‘आपला मावळा’साठी मोठी घोषणा!

NCP Politics: राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय; तटकरे-पटेलांच्या भेटीनंतर आता रोहित पवार नाराज?
3

NCP Politics: राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय; तटकरे-पटेलांच्या भेटीनंतर आता रोहित पवार नाराज?

अजितदादांच्या अपघात प्रकरणात भोंदू खरातचे कनेक्शन समोर? रोहित पवार यांचा मोठा खुलासा
4

अजितदादांच्या अपघात प्रकरणात भोंदू खरातचे कनेक्शन समोर? रोहित पवार यांचा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.