Hope is still not given up today or tomorrow we will be a minister; Bharat Gogawle alleges against Uddhav Thackeray
Bharat Gogawle on Uddhav Thackeray : रायगडच्या पालकमंत्रीपदावरून भरत गोगावले यांचे नाव कमी झाल्यानंतरसुद्धा त्यांना विश्वास आहे आपण मंत्री होणार आहे. माध्यमांशी संवाद साधताना, त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडत, आम्हीदेखील चांगल्या हेतूने सुरतला गेलो होतो.
या राज्याला चांगला मुख्यमंत्री मिळावा या हेतूने
यावेळी त्यांनी रायगडावरील सर्व कार्यक्रमांमध्ये एक शिवभक्त म्हणून आम्ही हजर असतो. त्यामुळे आम्हाला शिवाजी महाराज सुरतला का गेले होते हे माहिती आहे. आम्हीदेखील चांगल्या हेतूने सुरतला गेले होतो. या महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळावा यासाठी आम्ही गेलो होतो. तो मुख्यमंत्री या राज्याला मिळाला.
स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी दबाव
त्यांना सत्तेवरुन खाली उतरवले आहे म्हणून त्यांना वाईट वाटते आहे. 30 वर्षे आम्ही सहकार्य करतो त्यांना विचारा की आमचा त्यांना आधार आहे की सहकार्य वाटते आहे. आम्ही स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी दबाव टाकत आहे. नॅपकिन हा आमचा पहिल्यापासून आहे असे नाही आहे की आमदार झालो आणि नॅपकिन घेतला.
तानाजी मालुसरेंच्या भूमीतील असल्याने
नॅपकीनचाल उपयोग आम्ही चांगल्या साठी करत आहोत. मंत्री आम्ही होणार होतो. तानाजी मालुसरेंच्या भूमीतील असल्याने मी थांबलो आहे. महाराष्ट्राचा राज्यकारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सुरु आहे ते काहींना खटकते आहे. अजूनही आम्ही आशा सोडलेली नाही आज ना उद्या आम्ही मंत्री होऊ शकतो. मात्र, मंत्री नाही झालो तरी आमच्या मतदार संघातील विकास कामे सुरु आहेत.