
Chakan Politics:
Chakan Politics: शिवसेनेत फुट पडल्यापासून राज्याच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. अशातच राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांमध्ये चाकण नगराध्यक्ष निवडणुकीसाठी एकत्र आल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे आणि ठाकरे गटाच्या या युतीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Palghar News : साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपीला भाजपकडून उमेदवारी ? पालघरमधील राजकीय वाद विकोपाला
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरताना ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे आणि शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे हे दोघेही एकत्र उपस्थित होते. एका वृत्तवाहिनीशी बोलताना बाबाजी काळे म्हणाले की, खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर ही पहिली निवडणूक होत आहे. “त्यांच्या पत्नी मनीषा गोरे नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहेत. अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून, दिवंगत आमदारांना आदरांजली म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. पण ही युती नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
बाबाजी काळे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय फक्त चाकण नगराध्यक्ष पदापुरता मर्यादित आहे. तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदी येथे आम्ही स्वबळावर लढत आहोत,” असेही बाबाजी काळे यांनी स्पष्ट केले.
मुंबई महानगर पालिका निवडणूक जवळ येत असताना पक्षातील अंतर्गत मतभेद उफाळून येऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील आमदार, खासदार आणि प्रमुख नेत्यांना स्पष्ट शब्दांत फटकारले.
काही नगरसेवकांनी आमदारांविरोधात शिंदेंकडे तक्रारी केल्या होत्या. आमदार आपल्या जवळच्या व्यक्तींना तिकिट मिळावे यासाठी दबाव आणत आहेत, नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेल्या विद्यमान नगरसेवकांच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत, असा त्यांचा आरोप होता. विशेषतः पश्चिम उपनगरातील काही इच्छुक विभागप्रमुख आणि माजी नगरसेवकांनीही कामात अनावश्यक हस्तक्षेप केल्याची नाराजी व्यक्त केली.
या तक्रारी गांभीर्याने घेत शिंदेंनी बैठकीत सांगितले की, “नगरसेवकांच्या अधिकारात कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. निवडणुकीत उमेदवारीबाबत अंतिम निर्णय नेतृत्व घेणार आहे. गटबाजी किंवा दबाव आणल्यास कठोर कारवाई होईल. पालिका निवडणूक तोंडावर असताना शिंदेंनी दिलेल्या या कडक इशाऱ्यामुळे पक्षात शिस्तीची लाट पुन्हा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.