Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सर्वगोड किती दिवस लपणार? हे आम्ही पाहतोच,’ सतीश सावंतांनी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना धरले धारेवर

कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यपध्दती ही पहिल्यांदा कामे करायची, नंतर टेंडर प्रक्रिया करायची अशी झाली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्याला बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वगोड जबाबदार आहेत.महायुतीने राजकोट किल्ला व पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा याबाबत सर्व निविदांची माहिती द्यावी. अशी मागणी सतीश सावंत यांनी केली

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 08, 2024 | 05:22 PM
सर्वगोड किती दिवस लपणार ? हे आम्ही पाहतोच, सतीश सावंतांनी सार्वजनिक बांधकाम अधिका-यांना धरले धारेवर

सर्वगोड किती दिवस लपणार ? हे आम्ही पाहतोच, सतीश सावंतांनी सार्वजनिक बांधकाम अधिका-यांना धरले धारेवर

Follow Us
Close
Follow Us:

भगवान लोके : कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यपध्दती ही पहिल्यांदा कामे करायची, नंतर टेंडर प्रक्रिया करायची अशी झाली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्याला बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वगोड जबाबदार आहेत.महायुतीने राजकोट किल्ला व पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा याबाबत सर्व निविदांची माहिती द्यावी. कणकवली तालुक्यातील 13 कोटींच्या 2 पुलांची निविदा ऑनलाईनला का दिसत नाही. यासह विविध प्रश्नांचा भडीमार ठाकरे शिवसेनेचे सतीश सावंत , सुशांत नाईक , कन्हैया पारकर , उत्तम लोके यांच्यासह पदाधिका-यांनी केला. त्यावर 11 ऑक्टोबरमध्ये सर्व माहिती लेखी स्वरुपात दिली जाईल,असे आश्वासन पत्र उपअभियंता श्री. बातुसकर यांनी दिले.

हेही वाचा- Devendra Fadanvis: “हा विजय मूर्खांच्या नंदनवनात…”; हरयाणातील विजयावर देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना डिवचलं

कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सर्वगोड यांच्या भेटीसाठी ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने वेळ मागितली होती. मात्र ते कामानिमित्त मुंबईत गेले .शिवसेनेने विविध प्रश्नांसाठी बांधकाम अधिका-यांची भेट घेतली असता बांधकाम विभागाच्या गेटवर कार्यकर्त्यांना पोलीसांनी रोखले. यावेळी पोलीस व तालुकाप्रमुख यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. आम्हाला कोणत्या कारणासाठी अडवता ? याची विचारणा पोलीस अधिका-यांनी करणे्यात आली असता 8 ते 10 जणांच्या शिष्ट मंडळाला बांधकाम कार्यालयात चर्चेसाठी सोडण्यात आलं. या आंदोलनात विधानसभा प्रमुख सतीश सावंत,युवा सेना जिल्हाप्रमुख,महिला आघाडी, जिल्हाध्यक्ष तालुकाप्रमुख आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यालयाचे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितली , त्यांनी का वेळ दिली नाही.आम्हाला जी काय माहिती हवी आहे, ती तुम्ही देणार का ? सर्वगोड यांच्या वतीने तुम्ही बसला तर आम्हाला माहिती तुम्हीच दिली पाहिजे अशी मागणी सतीश सावंत यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळला यावरुन या विभागाने किती मोठा भ्रष्टाचार केला हे दिसून येत आहे. असा आऱोप कन्हैया पारकर यांनी केली.

हेही वाचा- महापालिकेचा मनमानी कारभार; अजय चौधरींच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा ‘हंडा मोर्चा’

राजकोट किल्ला सुशोभिकरण , छत्रपतींचा पुतळा उभारणी , हॅलीपॅड उभारणी , रस्त्याची कामे ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-यानिमित्त साफसफाई खर्च , हॉटेल खर्च , जेवणांची बिले , पुतळा कोसळल्यानंतर समितीने दिलेला अहवाल , नवीन पुतळा उभारण्यासाठी 20 कोटी खर्चाचे अंदाजपत्रक , स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट ही माहिती किती दिवसांत माहिती देणार ते सांगा, असा प्रश्न करत सतीश सावंत यांनी बांधकाम उपअभियंत्यांना धरले धारेवर धरले. त्यानंतर 11 ऑक्टोबर पर्यंत ही माहीती लेखी स्वरुपात देण्याचे आश्वासन श्री. बातुसकर यांनी दिले.

ओरोस येथील अधिक्षक अभियंता कार्यालयाचे इंटेरियर आणि फर्निचर कामाची निविदा झाली आहे का ? त्याची माहिती द्या. अशी मागणी कन्हैया पारकर यांनी केली. अभियंत्यांकडे कोणतीही माहिती नव्हती तसेच कणकवली तालुक्यातील 6.5 कोटी रुपयांच्या 2 निविदा वृत्तपत्रात आल्या आहेत. मात्र,१८ ची नोटीस ऑनलाईन का दिसत नाही ? हा प्रकार कामे मॅनेज करायचा आहे. यांचे ठेकेदार ठरलेले आहेत. याबाबत वृत्तपत्रात पुन्हा जाहिरात प्रसिध्द करुन ऑनलाईन झाले नसल्याची माहीती जाहीर करावी अशी मागणी कन्हैया पारकर यांनी केली. त्यावर अधिका-यांनी पुन्हा वृत्त पत्रात जाहिरात देण्याचे आश्वासन दिले.
हळवल पुलाच्या जोडरस्त्याचे काम का रखडले ? चार वर्षापूर्वी जिल्हाधिका-यांनी पैसे देवूनही बांधकाम विभागाचा दुर्लक्ष का ? असा सवाल सुशांत नाईक , कन्हैया पारकर यांनी केला. तसेच कणकवली तालुक्यातील विविध प्रश्नांचा भडीमार बांधकाम अधिका-यावर शिवसेना पदाधिका-यांनी केला. यावर अधिकारी निरुत्तर झाले होते.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
ठाकरे शिवसेनेच्या पदाधिका-यांनी बांधकाम कार्यालयात विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही येणार असल्याचे जाहिर केले होते. मात्र कार्यकारी अभियंता कामानिमित्त मुंबईत गेल्यामुळे संघर्ष होण्याची शक्यता होती. त्यामुळे कणकवली भेटीदरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

Web Title: How long will sarvagod hide as we see this satish sawant held the public works officers on edge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 05:21 PM

Topics:  

  • Kankavli

संबंधित बातम्या

“रोजगार, युवकांची वाढत चाललेली बेकारी या बद्दल….;” युवासेनेच्या सुशांत नाईकांचा नितेश राणेंवर घणाघात
1

“रोजगार, युवकांची वाढत चाललेली बेकारी या बद्दल….;” युवासेनेच्या सुशांत नाईकांचा नितेश राणेंवर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.