
राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले
प्रभाग ८ ते १५ मधून या उमेदवारांच्या मुलाखती
भाजपामध्ये नऊ प्रभागांत एकमेव इच्छुक
कणकवली: कणकवली नगरपंचायत निवडणूक २०२५ साठी भाजपाकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार, निवडणूक प्रभारी तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थीतीत मुलाखती पार पडल्या. इच्छुकांना आपआपल्या प्रभागामध्ये कमळ हे चिन्ह घेऊन प्रचाराला लागा.
पक्ष देईल तो उमेदवार जिंकून आणण्यासाठी मेहनता घ्या. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी कागदपत्रांची तयारी ठेवा, असे संकेत इच्छुक उमेदवारांना देण्यात आले आहेत. या मुलाखतीच्या प्रक्रीयेत नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे यांचे एकमेव नाव समोर आले आहे. कणकवली येथील ओम गणेशा निवासस्थानी नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी पार पडल्या.
महायुती तुटण्याच्या मार्गावर? ‘डोक्यावर पडलेले आमदार’; ‘या’ नेत्याच्या टीकेने उडाली खळबळ
प्रभाग १ ते ७ मधून या उमेदवारांच्या मुलाखती
या मुलाखती घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सरचिटणीस संदीप साटम, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, आदी पदाधिकारी उपस्थित होते. कणकवलीत नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रभाग १ मध्ये राकेश राणे, किशोर राणे, चारुदत्त साटम, बूथ अध्यक्ष सखाराम राणे, प्रभाग २ मधून प्रतिक्षा सावंत, संजना सदडेकर, प्रभाग ३ मधून स्वप्नील राणे, प्रभाग ४ मधून माधवी महेंद्र मुरकर, प्रभाग ५ मधून मेघा गांगण, प्रभाग ६ मधून स्नेहा महेंद्र अंधारी, प्रभाग ७ मधून सुप्रिया समीर नलावडे यांनी मुलाखत दिली.
भाजपामध्ये नऊ प्रभागांत एकमेव इच्छुक
भाजपाकडून संभाव्य उमेदवारांची यादी १४ नोव्हेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपमधून निवडणूक लढविण्यासाठी प्रभाग ३. प्रभाग ४, प्रभाग ५. प्रभाग ६, प्रभाग ७, प्रभाग ८, प्रभाग १२, प्रभाग १४, प्रभाग १५ अशा ९ प्रभागांमध्ये एकमेव उमेदवार इच्छुक असल्याने यांची उमेदवारी निश्चित मानली जाते आहे. पक्षश्रेष्ठीकडून या सर्वच उमेदवारांना आपआपल्या प्रभागांमध्ये कामाला लागा. पक्ष तुमच्यासोबत आहे, असे निर्देश नेत्यांनी दिल्याचे समजते.
Maharashtra Politics: महायुतीमध्ये बिघाडी? भाजपचा ‘एकला चलो रे’चा नारा तर…
प्रभाग ८ ते १५ मधून या उमेदवारांच्या मुलाखती
प्रभाग ८ मधून गौतम खुडकर, प्रभाग ९ मधून मेधा महेश सावंत, आकांक्षा अभय राणे, प्रभाग १० मधून आर्या औदुंबर राणे, ज्योती परेश परब, रंजिता तहसीलदार, प्रभाग ११ मधून मथुरी महेंद्र चव्हाण, अनुष्का जाधव, प्रभाग १२ मधून मनस्वी मिथून ठाणेकर, प्रभाग १३ मधून गणेश उर्फ बंडू हर्णे, कल्याण पारकर, प्रभाग १४ मधून सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, प्रभाग १५ मधून अमोल रासम, प्रभाग १६ मधून संजय कामतेकर, प्रभाग १७ मधून रवीमद्र उर्फ बाबू गायकवाड, शिवसुंदर देसाई आदी इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत,