बुटीबोरीत एकाच रात्री दोघांनी घेतला गळफास
मुंबई : आजारी पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने पतीने मानसिक तणावात येऊन इमारतीच्या सातव्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना अंधेरी परिसरात घडली आहे. (Husband Suicide) चंद्रिकाप्रसाद निर्मल (वय 50) असं मृत पतीचं नाव आहे. याप्रकरणी अंधेरी येथील अंबोली पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
[read_also content=”गुलाबराव पाटील आज जळगावात; तब्बल ६० किलोमीटरची स्वागतयात्रा https://www.navarashtra.com/maharashtra/gulabrao-patil-in-jalgaon-today-a-welcome-journey-of-60-kms-nrrd-315506.html”]
चंद्रिकाप्रसाद निर्मल यांचा कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसाय होता. त्यांची पत्नी गीतादेवी यांना गेले काही दिवसांपासून पोटदुखीचा आजाराने त्रस्त होती. त्यांच्यावर रुग्णलायत उपचार सुरू होते. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांच्या पोटात खडा (स्टोन) असल्याचे सांगून शस्त्रक्रियेने तो काढण्याची आवश्यकता असलयाचे सांगितले होते. या शस्त्रक्रियेसाठी एक लाख रुपये खर्च येणार होता. पण चंद्रिकाप्रसाद यांच्याकडे शस्त्रक्रियेसाठी पुरेसे पैसे नव्हते. आर्थिक अडचणीमुळे ते गेल्याकाही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे त्यांनी ग्राहकांच्या कपड्यांना इस्त्री केले व ते कपडे घेऊन ते निघाले होते. [blurb content=””]त्यावेळी अंधेरी पश्चिम येथील रेड रोड इमारतीच्या सातव्या मजल्यावरील गच्चीतून त्यांनी उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांना तात्काळ कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
[read_also content=”रात्री केवळ दोन ते तीन तास झोपणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालाय, दीपक केसरकरकडून मुख्यमंत्र्यांच कौतुक https://www.navarashtra.com/maharashtra/deepak-kesarkar-praise-chief-minister-eknath-shinde-nrps-315520.html”]