एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांच्या 'त्या' विधानाचा घेतला समाचार; म्हणाले, 'मी लहान माणूस, पण गिरीश महाजन...'
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यातच आता राज्यात विधानसभा निवडणुका लवकरच घेतल्या जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक नेतेमंडळींचे पक्षबदलाचे वारे वाहत आहे. असे असताना ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशावर मोठं विधान केलं आहे. ‘भाजपमध्ये जाण्याची माझी इच्छा आहे. पण, मी अजूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहे. शरद पवारांनी माझा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला आहे’, असे त्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : ‘आम्ही शांत बसणार नाही’… परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले खडेबोल
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सर्व नेत्यांचे दौरे वाढले असून इच्छुकांनी तयारी सुरु केले आहे. राज्यातील असा एक नेता आहे जो नक्की महायुतीमध्ये आहे की महाविकास आघाडीमध्ये हे समजत नव्हतं. मात्र, आता खुद्द एकनाथ खडसे यांनी आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असल्याचे म्हटले आहे.
ते म्हणाले, ‘मी भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. अजून थोडे दिवस वाट पाहीन आणि नंतर शरद पवारांसोबत सक्रीय होणार आहे. मी भाजपकडे प्रवेशाबाबत विनंतीही केली आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, ‘मी अजूनही राष्ट्रवादीचा आमदार आहे. मी भाजपमध्ये जाण्यास इच्छुक जरी असलो तरी मला पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही. भाजप प्रवेशासाठी मी त्यांच्याकडे विनंती केली पण प्रतिसाद नाही. मी राष्ट्रवादीच्या आमदारकीचा अजून राजीनामा दिला नाही. पवारांनी देखील राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला आहे’.
भाजपमध्ये जाण्याची माझी इच्छा
भाजपमध्ये जाण्याची माझी इच्छा होती. पण मला अद्याप भाजपकडून प्रतिसाद मिळालेला नाही. मी अजूनही आणखी वाट पाहणार आहे. थोडे दिवस वाट पाहिल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतच सक्रीय राहणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.
एकनाथ खडसे यांच्या घरवापसीच्या चर्चांना उधाण
एकनाथ खडसे हे आधी भाजपमध्ये होते. मात्र, नंतर त्यांनी शरद पवार यांची साथ देण्याचे ठरवले. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आता एकनाथ खडसे यांची घरवापसी होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याचा मुहूर्त काही ठरवल्या जात नाही. लोकसभा निवडणूकीच्या पूर्वी एकनाथ खडसे भाजपमध्ये पुन्हा येतील असे बोलले जात होते. पण, लोकसभा निवडणूक होऊन निकाल आला. तरीही ते अद्याप राष्ट्रवादीतच आहेत.
हेदेखील वाचा : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘हे’ दोन विद्यमान आमदार भाजपमध्ये दाखल