'दिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल' : एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना इशारा
मिठी नदीततला गाळ कोण काढतोय, तर दिनो मोरिया. यांना गाळ काढायला मराठी माणूस दिसला नाही. तिथे यांना मोरे दिसला नाही. पण, दिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होणार, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी विधान भवनातून थेट उद्धव ठाकरेंचं नाव न घेता इशारा दिला आहे. कोविड महामारित खिचडी चोरणारे, डेडबॉडी चोरणारे आमच्यावर आरोप करत आहेत. कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय?,असा सवालही त्यांनी यावेळी केला.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, काही लोकांनी अर्धवट माहितीच्या आधारे मुद्दे मांडले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत, त्यामुळे कामं होत नाही असं सांगण्यात आलं. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टात असल्याने घेता आल्या नाहीत. ओबीसी आरक्षण हेही महत्त्वाचं आहे.ओबीसी आरआरक्षणाशिवाय निवडणुका नको होत्या, मात्र आता कोर्टाने आदेश दिले आहेत. तसंच मिठी नदीच्या गाळाचा मुद्दा उपस्थित करत दिनो मोरियाला हे कंत्राट का दिलं, असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला.
“त्यांना असली शिवसेना पाहिजे की डुप्लिकेट? फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर संजय राऊत स्पष्टच बोलले
निवडणूक झाली नसली तरी कोणतंही काम थांबलेल नाही. मुंबईत बदल होत आहे. आमच्यासाठी मुंबईकर फर्स्ट आणि इतरांसाठी कंत्राटदार फर्स्ट आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच चहल यांना बोलावले आणि खड्यांच्या संदर्भात सांगतील आणि त्यानंतर दोन फेजमध्ये सर्व रस्ते करण्याचे आदेश दिले. पहिला फेज पूर्ण झाला आहे, आपण काँक्रीटीकरण करत आहोत, त्यामुळे मुंबई खड्डेमुक्त होईल.
मराठी माणसासाठी काय केलं असं म्हणत अनेकजण गळे काढतात, मात्र तो बाहेर का फेकला गेला याचं आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. कोणाच्या काळात हे बाहेर गेले, पत्राचाळीमध्ये कोणी माया गोळा केली? संक्रमण शिबिरात खुराड्यासारख ठेवण्यात आलं ती मराठी माणसं नाहीत का? असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला. मुंबईतील रमाबाई नगरमध्ये भाडं दिलं जात नव्हतं, मी स्वत: चेक वाटून आलो. गिरणी कामगारांच्या संदर्भात ही बैठक झाली. ज्यादा इन्सेटिंव देऊन त्यातून निर्माण होणारी घर गिरणी कामगारांना देण्यात येणार आहेत. 1 लाख लोकांचा आम्ही पहिल्यांदा सर्व्हे केला, किती पात्र लोक आहेत याची नोंद केल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.