खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला (फोटो - टीम नवराष्ट्र)
Sanjay Raut Live : मुंबई : सध्या राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपला आहे. अंबादास दानवे यांचा विधीमंडळामध्ये निरोप समारंभ झाला. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बसण्यावरुन झालेल्या बोलक्या हालचालींवरुन राजकारण रंगले आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशेजारी बसण्यास नकार दिला. यानंतर आता यावरुन राजकारणात चर्चा सुरु असताना खासदार संजय राऊत यांनी देखील निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार राऊत म्हणाले की, तुमचं काय म्हणणं होतं त्यांनी शिंदे यांना मांडीवर घेऊन बसला पाहिजे होतं का? उद्धव ठाकरे हे एक स्वाभिमानी नेते आहेत ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत गद्दारी केली ज्यांनी डुप्लिकेट शिवसेना स्थापन करून जसे पेशवे काळामध्ये तोतये होते. सदाशिवराव भाऊ डुबलीकेट तसेच हे सगळे डुप्लिकेट आहेत त्यांच्याबरोबर काय हस्तांदोलन करायचं महाराष्ट्राला हे आवडलं नसतं, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर विधान परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना स्पष्ट भाषेत ऑफर दिली. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आहेत ते अशा प्रकारच्या टपल्या टिचक्या टोमणे मारण्यात पटाईत आहेत आणि त्यानुसार त्यांनी तो एखादा टोमणा मारला असेल त्याकडे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीस याला मी ऑफर म्हणत नाही आपल्या टपल्या टिचक्या म्हणतो. राजकारण आणि बहुमत फार चंचल असतं, लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे बहुमत राजकारण हे चंचल आणि अस्थिर असतात. उद्या काय होईल ते सांगता येत नाही, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
डुबलीकेट राष्ट्रवादी अन् डुबलीकेट शिवसेना सत्तेत
पुढे ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर डुबलीकेट लोक बसलेली आहेत शिवसेना म्हणून, त्यांचा विचार फडणवीस यांना अधिकारावा लागेल आपल्याबरोबर डुबलीकेट ठेवायचे की असली ठेवायचे. सध्या देवेंद्र फडणवीस हे डुबलीकेट शिवसेनेबरोबर सत्ता भोगत आहेत, डुप्लिकेट शिवसेना डुप्लिकेट राष्ट्रवादी त्यांना कोणता वैचारिक आधार नाही अस असताना तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत येण्याचे ऑफर देत आहात ही वैचारिक दिवाळखोरी आहे. सध्या तरी त्यांचा कारभार डुप्लीकेट लोकांना घेऊन चालला आहे. डुप्लीकेट राष्ट्रवादी काँग्रेस डुप्लीकेट शिवसेना त्याच्यामुळे शिवसेनेचे जे चाललं आहे ते उत्तम चालले आहे,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.