Kunal Kamra X Post : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने दोन महिन्यांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या एका विडंबनात्मक कवितेमुळे चांगलाच वाद उफाळून आला होता. त्याच्या या कवितेनंतर शिंदे समर्थकांनी संबंधित स्टुडिओची तोडफोडही केली होती. त्यामुळे देशभरात हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा कुमाल कामराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगा,असे आवाहन केलं आहे.
एका मुलाखतीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुणाल कामरा संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, माझ्या मते राजकीयदृष्ट्या अशा लोकांकडे दुर्लक्ष केलेलंच चांगलं. या लोकांची औकात नसताना तुम्ही त्यांची औकात का वाढवता.त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष केलेलंच चांगलं. पण भाजप आणि शिवसेना हे पक्ष भावनिक आहेत. त्यामुळे भावनेच्या भरात लोकांना कधी कधी अशा प्रतिक्रीया दिल्या जातात. अशा प्रतिक्रीयांमुळे अशा लोकांना जास्त महत्त्व मिळत जातं. खरंतर अशा लोकांना चार लोकही ऐकत नाहीत, असं म्हणत फडणवीसांनी कुणाल कामराला टोला लगावला.
PM Modi Bihar Visit: पंतप्रधान मोदींनाच जीवे मारण्याची धमकी; बिहारमध्ये संशयिताला अटक
देवेंद्र फडणवीसांच्या या प्रतिक्रीयेनंतर त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ पोस्ट करत कुणाल कामराने फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. माझी औकात नसले तर एकनाथ शिंदे यांना तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करायला का सांगत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कुणाल कामराने त्याच्या ट्विटर एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “देवेंद्र फडणवीसजी तुमचं बरोबर आहे. राजकीयदृष्ट्या माझ्याकडे दुर्लक्ष करणंच चांगलं आहे. माझी औकात नसेल तर तुम्ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे दुर्लक्ष करायला का सांगत नाही? चार लोकही माझा शो पाहत नसतील तर माझ्याकडे दुर्लक्ष करायला का सांगत नाहीत? येत्या ऑक्टोबरमध्ये मी मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शो घेणार आहे. तुम्ही बोललात ते खरच होतं. असा टोलाही त्याने फडणवीसांना लगावला आहे.
Stock Market Today: शेअर बाजारावर आज होणार या घटकांचा परिणाम, निफ्टीसाठी हा स्तर ठरणार महत्त्वाचा
याच पार्श्वभूमीवर, कुणाल कामराच्या या शोच्या व्हायरल झालेल्या पोस्टवर देवेंद्र फडणवीस यांच्या फॅनपेजने दिलेल्या उत्तराने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. त्या उत्तरात म्हटले आहे, ”प्रत्येक वेळी निवडणुका जवळ येतात, तेव्हा तुमचे शो राजकीय रॅलीत बदलतात. प्रेक्षकांमध्ये ४ लोक असतात, पण लक्ष वेधण्यासाठी ४०० ट्विट्स होतात. तुम्हाला दुर्लक्षित केलं जात नाही — तुम्ही फक्त महत्त्वाचे नाहीत.” तर काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कुणाल कामराला शो रद्द करण्याचा सल्लाही दिला आहे.
कुणाल कामराने एका स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ म्हणून संबोधले होते. या विडंबनाचा व्हिडिओ समोर आल्यावर गत २३ मार्च रोजी रात्री सत्ताधारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबवर तोडफोड केली.या घटनेनंतर खार पोलिस ठाण्यात तीन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यापैकी पहिला गुन्हा जळगावच्या महापौरांनी दाखल केला आहे, तर उर्वरित दोन गुन्हे नाशिकमधील दोन वेगवेगळ्या व्यावसायिकांनी दाखल केले आहेत. प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वाद वाढले असून, यामुळे स्टँड-अप कॉमेडी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.