Raj Thackeray
मुंबई – मुलुंडमध्ये मराठी माणसाला एका गुजराती सोसायटीत कार्यालय भाड्याने देण्यास नकार दिल्यानंतर भाषिक वाद व प्रांत वाद होण्याची शक्यता आहे. मुलुंड परिसरात मराठी भाषिकांना दुय्यम वागणूक दिल्यानंतर या प्रकरणात जाब विचारल्यावर मारहाण केल्याचाही आरोप तृप्ती देवरुखकर एकबोटे यांनी सोशल मीडियावर केला आहे. याचा जाब मनसे कार्यकर्त्यांनी विचारत वृद्धांचे वय पाहता त्याला मारहाण केली नाही, पण त्याच्याकडून माफीनामा घेतला. दरम्यान, या व्हीडिओनंतर आता वातावरण तापले असताना, यावर विविध प्रतिक्रिया येत असताना, आता स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी ट्विट करत, तिखट प्रतिक्रिया दिली आहे. (if this happens again in maharashtra the cheeks will rise mns president raj thackeray warning after the incident in mulund)
मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने…
— Raj Thackeray (@RajThackeray) September 29, 2023
…तर गालावर वळ उठतील हे निश्चित
“मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे. काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे!” असं ट्विटमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
केवळ मराठी म्हणून घर नाकारलं – पंकजा मुंडे
दरम्यान, सध्या मुलुंडमधील संतापजनक प्रकारवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना, माजी मंत्री व भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंनी देखील आपणालाही असाच अनुभव आल्याचं सांगितलं आहे. जेव्हा माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं, तेव्हा हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला की मराठी माणसांना घर देत नाहीत. मी कधीही जातीवाद, धर्मवाद आणि भाषावाद याच्यावर टिप्पणी केली नाही. पण एक मुलगी जेव्हा एक रडून सांगत होती की, इथे मराठी माणसाला घर देत नाही किंवा मराठी माणूस येथे अलाउड नाही हे म्हणत, असताना तिच्यावर प्रकार झाला तो प्रकार मला अस्वस्थ करणार आहे, असं व्हीडिओमध्ये पंकजांनी म्हटलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुलुंड पश्चिम परिसरातल्या शिवसदन इमारतीमध्ये आपण भाड्यानं कार्यालयासाठी जागा पाहण्यास गेलेली असताना मालकानं आम्ही महाराष्ट्रीयन माणसाला कार्यालय देणार नाही असं सांगून धक्काबुक्की केल्याचा आरोप तृप्ती देवरुखकर एकबोटे यांनी केला आहे. तृप्ती देवरूखकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओनंतर चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. तसेच विविध राजकीय पक्षातून संताप व्यक्त केला जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुलुंडमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी सदर व्यक्तीला जाब विचारला. यानंतर आज यावरुन राऊतांनी सरकारवर टीका केली आहे.