मुंबईत ३२५ कोटींचा शिपिंग घोटाळा! भारतीय आणि परदेशी एजन्सींवर धक्कादायक आरोप
Prakash Ambedkar : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी
मुंबई पोलिसांनी या घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे. तक्रारीत अनेक भारतीय आणि परदेशी शिपिंग एजन्सींवर सुनियोजित कॉर्पोरेट कटाचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण उद्योगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
तक्रारदाराच्या मते, आरोपींनी जहाज मालकांना शिपिंग ऑपरेशन्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी खात्रीशीर नफ्याचे आश्वासन देत आमिष दाखवले. सुरुवातीच्या करारातून आरोपींना जहाज मालकांचा विश्वास संपादन केला. पण त्यानंतर सर्व व्यवहारांमध्ये फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात लीला मोम्बसा आणि XXH-2 या दोन जहाजांचा समावेश आहे.
कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी
लीला मोम्बासा, जे १ ऑगस्ट २०२५ रोजी न्हावा शेवा येथे थांबणार होते. १३ ऑगस्ट रोजी, शिपमेंट उशिरा पोहोचली. पण ₹१३० कोटी किमतीचा माल जिबूतीऐवजी ओमानला पाठवण्यात आला.त्यावरून तक्रारदारावर १० लाख अमेरिकन डॉलर्स (अंदाजे ₹८३ कोटी) भरण्यासाठी दबाव आणण्यात आला. पण ठरलेल्या करारानुसार जहाजांचे संचालन केले गेले नाही.
लीला मोम्बासा १५ सप्टेंबरला जिबूतीमध्ये पोहोचला, तर XXH-२ जेद्दाहून कराचीला नेण्यात आले आणि १० दिवसांसाठी रोखून ठेवण्यात आले. त्यातच सुरक्षा चेक बाउन्स झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत गेली. परिणामी, ₹२९० कोटींपेक्षा जास्त किमतीचा माल आरोपींच्या नियंत्रणाखाली गेला. या सर्व घटनाक्रमामुळे निर्यातदारांचे मोठे नुकसान झाले. EOW ने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे आणि सर्व आरोपींना कागदपत्रांसह बोलावण्यात आले आहे. ही फसवणूक भारत आणि परदेशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाले आहे, असा दावा तक्रारदाराने केला आहे.






