Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्यात दम असेल तर…; फडणवीसांच्या त्या विधानावर संजय राऊतांचे खुले आव्हान

विवारी (21 जुलै) पुण्यात झालेल्या भाजपच्या मेळाव्यात बोलताना, आज तुम्हाला परवानगी देतो. ज्याला बॅटिंग करायची आहे, त्याने करावी. बाकी आदेश विचारू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.त्यांच्या या विधानाला राऊतांनी ईडी, सीबीआयची हत्यारे बाजूला ठेवून आणि राजीनामा देऊन मैदानात या, मग आम्ही दाखवतो, अशा शब्दांत उत्तर देत त्यांना खुले आव्हान दिले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 22, 2024 | 10:31 AM
तुमच्यात दम असेल तर…; फडणवीसांच्या त्या विधानावर संजय राऊतांचे खुले आव्हान
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: ईडी,सीबीआयची हत्यारे अंगाला लावून आमच्या अंगावर येऊ नका, तुमच्यात दम असेल ना ईडी,सीबीआय बाजूला ठेवा मग आम्हीपण बघतो. महाराष्ट्र काय आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिले आहे.

रविवारी (21 जुलै) पुण्यात झालेल्या भाजपच्या मेळाव्यात बोलताना, आज तुम्हाला परवानगी देतो. ज्याला बॅटिंग करायची आहे, त्याने करावी. बाकी आदेश विचारू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.त्यांच्या या विधानाला राऊतांनी ईडी, सीबीआयची हत्यारे बाजूल ठेवून आणि राजीनामा देऊन मैदानात या, मग आम्ही दाखवतो, अशा शब्दांत उत्तर देत त्यांना खुले आव्हान दिले आहे.

संजय राऊत म्हणाले, ‘काल गृहमंत्र्यांसमोर देवेंद्र फडणवीस कोणत्या प्रकारची भाषा वापरत होते, महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा, ही कुठली भाषा आहे. एका गुंडाची भाषा वापरत आहेत. रस्त्या-रस्त्यावर गुंडगिरी सुरू आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत आणि आपण म्हणताय ठोकून काढा, म्हणजे हा पराभव तुमच्या इतका आरपार गेला आहे का? आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र फडणवीस आणि अमित शहांची अशी भाषा सहन करणार नाही. तुम्ही गृहमंत्री असतानाही ठोकशाहीची भाषा करताय, मग अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि ही भाषा करून दाखवा, मग ठोकशाही काय आहे, हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवेल.

यांच्याच डोक्यात औरंगजेब आहे, यांनाच निवडणुका जिंकण्यासाठी औरंगजेब हवा आहे. यांनी ठिकठिकाणी औरंगजेबाचे फॅन्सक्लब सुरू केलेत. यांना हिंदू-मुसलमानांमध्ये दंगली घडवायच्या आहेत. म्हणून यांच्याच तोंडात औरंगजेब आहे, आमच्या नाही. असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

राऊत म्हणाले, महाराष्ट्रातला पराभव त्यांना जिव्हारी लागला आहे. निवडणुकीच्या प्रचारातही अमित शहांनी शरद पवार,उद्धव ठाकरेंवर आरोप केले. आता त्यांना औरंगजेब फॅन्सक्लबचा प्रमुख म्हणून टीका केली. पण तरीही महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा दारूण पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रहितासाठी सुरत लुटली. पण गुजराती व्यापाऱ्यांना आम्ही  महाराष्ट्र लुटू देणार नाही हा संदेश  लोकसभ निवडणुकीच्या निकालाने अमित शहांना दिला आहे. आणि ते आता त्याचा आक्रोश करत आहेत.

‘शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब हे दोघेही महाराष्ट्राच्या राजकारणातीस सन्माननीय व्यक्ती आहेत. आम्ही भाजपसारख्या खोटारडेपणाच्या मशीन लावून काम करत नाही. ईव्हीएम चे घोटाळे करून, निवडणूक रोख्यांचे, ईडी,सीबीआयचे घोटाळे करून आम्ही जिंकत नाही. आम्हाला स्पष्ट आणि स्वच्छ मार्गाने विजयी केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: If you dare sanjay rauts open challenge on that statement of fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 10:31 AM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Loksabha 2024
  • Maharashtra Assembly election 2024
  • sanjay raut

संबंधित बातम्या

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले
1

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
2

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार
3

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार

Thackeray Brothers Alliance: ठरलं तर, ठाकरे बंधु एकत्र येणार…! संजय राऊतांची मोठी घोषणा
4

Thackeray Brothers Alliance: ठरलं तर, ठाकरे बंधु एकत्र येणार…! संजय राऊतांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.