Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut News: ‘हिंमत असेल तर करून दाखवा…’; औरंगजेबाच्या कबरीवरून संजय राऊतांचे खुले आव्हान

औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या राजकीय वादात आता विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलही आक्रमक झाले असून, शासनाने ही कबर लवकरात लवकर हटवावी, अशी त्यांची मागणी आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 17, 2025 | 12:29 PM
Sanjay Raut News: ‘हिंमत असेल तर करून दाखवा…’; औरंगजेबाच्या कबरीवरून संजय राऊतांचे खुले आव्हान
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या राजकीय वादात आता विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलही आक्रमक झाले असून, शासनाने ही कबर लवकरात लवकर हटवावी, अशी त्यांची मागणी आहे. या मागणीसाठी आज राज्यभर आंदोलन होणार आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी या विषयावर भाजपवर निशाणा साधत, “राज्यात आणि देशात त्यांचेच सरकार आहे, मग कबरीबाबत निर्णय घेण्यास कोणी अडवले?” असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, “नाटकं न करता थेट सरकारी आदेश काढून कबर हटवा, हिंमत असेल तर करून दाखवा,” असे आव्हानही त्यांनी दिले आहे. या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात यावर आणखी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून भाजप आणि संघ परिवारावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत विचारले की, “राज्यात आणि देशात भाजपचेच सरकार आहे, मग कबरीबाबत निर्णय घेण्यास कोणी अडवलं? शासनाने थेट कारवाई करावी, आंदोलन आणि नाटकं कशाला?”तसेच, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्यावरही निशाणा साधत म्हटले की, “हे सगळे संघटनेचीच पिल्लं आहेत, मग शासकीय आदेश काढून कबर हटवण्याची हिंमत दाखवा.” या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजप आणि संघ परिवार यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून भाजपवर आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी विचारले की, “जर केंद्र सरकारला ही कबर हटवायची असेल, तर ती का हटवत नाही? आणि मग तिच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारचे पोलीस दल तैनात का आहे?” त्यांनी ‘सामना’ च्या अग्रलेखाचा उल्लेख करत शिवरायांच्या शौर्याचा दाखला दिला आणि औरंगजेबाची कबर हे महाराष्ट्राच्या इतिहासात एक स्मारक असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, “जो कोणी महाराष्ट्राशी पंगा घ्यायला येईल, त्याने आधी संभाजीनगरला जाऊन औरंगजेबाची कबर पाहावी, मग महाराष्ट्राच्या वाट्याला यावं.” यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची कबर खणली होती. ती कबर बघा आणि मग महाराष्ट्राच्या नादाला लागा. हा इतिहास आहे.त्यांनी इतिहास विसरणाऱ्यांवर निशाणा साधत म्हटले की, “ज्यांना इतिहासाचे भान नाही, तेच असे मुद्दे उकरून काढत आहेत. अफजलखानाचा कोथळा महाराजांनी काढला होता, तो इतिहासही पिढीला माहिती असायला हवा.”

तसेच, त्यांनी हिंदुत्ववादी गटांवर आरोप करत म्हटले की, “ही काही उद्योग करणारी लोकं आहेत, त्यांना पैसे पुरवले जातात आणि त्यांना इतिहास नष्ट करायचा आहे. पण ही थडगी असायलाच पाहिजे, कारण हा आमच्या शौर्याचा इतिहास आहे.”त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण अधिकच तापले असून, भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून त्यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: If you have the courage do it sanjay rauts open challenge from aurangzebs tomb nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 12:29 PM

Topics:  

  • sanjay raut

संबंधित बातम्या

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांचे CCTV फुटेज गायब? राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई
1

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांचे CCTV फुटेज गायब? राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई

Maharashtra Politics: संजय राऊतांच्या जिवाला धोका? बॉम्ब शोध पथक घरी दाखल
2

Maharashtra Politics: संजय राऊतांच्या जिवाला धोका? बॉम्ब शोध पथक घरी दाखल

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये राज ठाकरेंवर अन्याय? आरोप होताच संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये राज ठाकरेंवर अन्याय? आरोप होताच संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

‘गेल्या 60 वर्षांत शिवसेनेने कधीही सौदेबाजी केली नाही, पण शिंदेंनी…’; संजय राऊत यांचे टीकास्त्र
4

‘गेल्या 60 वर्षांत शिवसेनेने कधीही सौदेबाजी केली नाही, पण शिंदेंनी…’; संजय राऊत यांचे टीकास्त्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.