राज्यभरात पावसाचे थैमान; मुंबई, नांदेडमध्ये घराची भिंत कोसळून चार जणांचा जागीच मृत्यू
पुणे: दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान काळ रात्रीपासून राज्यात पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. गेल काही दिवस राज्य मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान पुढील तीन तासांमध्ये पुणे, सातारा या भागात तुरळक ते अंतीं मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाचा आजचा राज्यासाठी पावसाचाच काय अंदाज आहे ते जाणून घेऊयात.
कोकण किनारपट्टीवर तर पावसाने धुमाकूळ घातला आहे. पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. समुद्र खवळला आहे. मुसळधार पाऊस आणि समुद्राला आयुधं आले आहे.. जोरदार पावसामुळे समुद्राच्या अजस्त्र लाटांचा फटका गणपतीपुळे येथील श्री गणेश मंदिराला देखील बसल्याचे पाहायला दिसून येत आहे.
रायगडमधील महाड, माणगाव, कोलाड, पोलादपूर या भागातसुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सावित्री नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडीने नदीने इशारा पातळी गाठल्याचे समजते आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच चिपळूण, संगमेश्वर आणि लांजा व राजापार जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरूच आहे.
गेले काही दिवस पुणे शहरात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून येतंब होते. मात्र दोन दिवसांपासून पुण्यात पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. काल रात्रीपासून पुणे शहरात पावसाचा जोर वाढला आहे. सकाळपासून साहहरात पावसामुळे काळोख पाहायला मिळत आहे. खडकवासला धरण क्षेत्रात देखील पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे कदाचित पाण्याचा विसर्ग सुरु केला जाऊ शकतो.
Heavy Rain Alert: पुढील २४ तासांसाठी पुणे आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट; रत्नागिरीत जगबुडीने…
मोडक सागर, मध्य वैतरणा, तानसा धरणातुन विसर्ग सुरू
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा या धरणातुन अनुक्रमे ४४८८.२५, २०१२.६७ आणि ३३१५.२५ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. विदर्भात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. मराठवाड्यातील काही जिल्हे अजून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे.