
बेशिस्त चालकांना २३३० कोटींचा दंड; गेल्या वर्षभरात ५० लाख ९६ हजार वाहनचालकांना ई-चलान
मुंबई : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून वर्षभरात ५० लाख ९६ हजार ई-चलान जारी करत तब्बल ४९६ कोटींचा दंड ठोठावला आहे. तर गेल्या आठ महिन्यांत ४ कोटी २९ लाख १६ हजार जणांना २ हजार ३३० कोटी ८२ लाखांचा दंड केला. पण, ५४ टक्के दंड वसूली झाली. गेल्या वर्षात मुंबईत २ हजार ६४५ अपघात घडले. त्यात ३६३ जणांचा मृत्यू, तर १ हजार ९७४ जण गंभीर जखमी झाले.
मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने वाहनचालकांवर कारवाईसाठी ऑक्टोबर २०१६ मध्ये ई-चलान प्रणाली सुरु केली. वेगमर्यादा तपासणारे कॅमेरे बसविले. गेल्या आठ महिन्यांत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ४ कोटी लाख १६ हजार ई-चलान जारी करण्यात आले. त्यात ३ हजार ३३० कोटी ८२ लाख रुपयांचा दंड ठोठावला. आतापर्यंत २ कोटी २९ लाख ६३ हजार ६१० ई-चलानचे १०२१ कोटी ३९ लाख ३५ हजार ५७० रुपयांचा दंड वसूल केला आहे. अजूनही १ हजार २३९ कोटी ४३ लाख १२ हजार ९५० दंड वसूल करणे शिल्लक आहे.
हेदेखील वाचा : Triple Riding Challan Price: खबरदार! दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांची खैर नाही, भरवा लागेल इतक्या रुपयांचा दंड
‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’च्या घटनामध्ये दंड आकारून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने एप्रिल २०२५ पासून मद्यधुंद चालकाविसधात थेट गुन्हे दाखल करून त्यांची नावे सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. मद्यपि चालकांचा परवाने निलंबित केले जात आहे. या कारवाईमुळे मद्यधुंद वाहनचालकांच्या घटनांमध्ये घट झाली.
ट्रिपल सीटवर होणार कडक कारवाई
दुसरीकडे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करून दुचाकीवर ट्रिपल सीट चालवणे महागात पडू शकते. मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई होऊ शकते. हा केवळ दंडाचा विषय नाही तर जीवाला धोका देखील निर्माण करतो, कारण त्यामुळे तोल बिघडू शकतो आणि अपघात होण्याची शक्यता असते. अनेकदा गाडी चालवताना दुचाकीवर दोघांऐवजी तीन प्रवासी दिसून येता. जे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात आणि दुचाकीवर ट्रिपल सीट चालवतात त्यांना मोटार वाहन कायद्याअंतर्गत वाहतूक चालान जारी केले जाऊ शकते.