Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: शहर विद्रूप करणाऱ्यांवर थेट अ‍ॅक्शन! मुंबईत ४१ बॅनर्सवर कारवाई, ३ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

Mumbai: नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने बॅनरबाजीवर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार पालिकेने धडक कारवाई करत दोन दिवसांत मुंबईतील अनधिकृत बॅनर्सवर कारवाई केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 24, 2026 | 05:10 PM
शहर विद्रूप करणाऱ्यांवर थेट अ‍ॅक्शन! मुंबईत ४१ बॅनर्सवर कारवाई, ३ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल (Photo Credit- X)

शहर विद्रूप करणाऱ्यांवर थेट अ‍ॅक्शन! मुंबईत ४१ बॅनर्सवर कारवाई, ३ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • शहर विद्रूप करणाऱ्यांवर थेट अ‍ॅक्शन!
  • मुंबईत ४१ बॅनर्सवर कारवाई
  • ३ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी दिसून येत असून, त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. याप्रकरणी नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने बॅनरबाजीवर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार पालिकेने धडक कारवाई करत दोन दिवसांत मुंबईतील अनधिकृत बॅनर्सवर कारवाई केली आहे. तसेच गावदेवी, मलबार हिल आणि डॉ. डी. बी. मार्ग पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

पालिकेने केलेल्या कारवाईत एकूण ४१ बॅनर्स निष्कासित करण्यात आले. महानगरपालिका उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव मार्गदर्शनाखाली अनुज्ञापन खात्याकडून ही कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेच्या डी विभागातील डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड), पंडिता रमाबाई मार्ग, भुलाभाई देसाई मार्ग, वाळकेश्वर, मलबार हिल, डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग, मौलाना शौकत अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग तसेच राजा राममोहन रॉय मार्ग या ठिकाणी अनुज्ञापन खात्याकडून निष्कासन कारवाई करण्यात आली.

अधिनियम १८८८ मधील कलमांतर्गत कारवाई

अशा प्रकारच्या विना परवानगी जाहिरात फलक, बॅनर, पोस्टर लावणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेविरोधात ‘महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा-१९९५’ मधील तरतुदी तसेच ‘मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८’मधील कलम ३२८/३२८-अ, ४७१ अन्वये कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. या तरतुदींचा भंग करताना आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करणे तसेच न्यायालयीन दावा दाखल करणे या कायदेशीर कारवाईचा समावेश असल्याची माहिती अनुज्ञापन विभागाने दिली आहे. महानगरपालिकेने मंजुरी दिलेल्या ठिकाणीच परवानगी घेवून जाहिराती प्रदर्शित कराव्यात, असे आवाहनही महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्याने केले आहे. तसेच यापुढेही सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना बॅनर्स, फलक, पोस्टर्स लावणा-यांविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २७ जानेवारीपासून ‘या’ भागांत १० टक्के पाणीकपात; पाहा संपूर्ण यादी

हायकोर्टाच्या निर्देशानुसार मनाई

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना कोणतेही फलक, बॅनर, पोस्टर प्रदर्शित करण्यास मनाई आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक रस्ते तसेच पदपथांवर महानगरपालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही विषयाचे जाहिरात फलक (होर्डिंग), बॅनर किंवा पोस्टर लावण्यास प्रतिबंध आहे.

टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याची सुविधा

विनापरवाना आणि अनधिकृत जाहिरात फलक (होर्डिंग) तसेच बॅनरविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी १९१६ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
विनापरवाना प्रदर्शित केलेल्या जाहिरात फलकांविरोधात तक्रार नोंदविण्याची सुविधा महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

‘प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलात तर पगार…’, मुंबई उच्च न्यायालयाचा बीएमसी आणि नवी मुंबई आयुक्तांना इशारा

Web Title: Mumbai police bmc action against unauthorized banners fir registered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • BMC
  • Mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम
1

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

शेतकरी कर्जमाफीवर कृषिमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा; शेतकऱ्यांना सरसकट लाभ मिळणार, 30 मार्चपूर्वी…
2

शेतकरी कर्जमाफीवर कृषिमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा; शेतकऱ्यांना सरसकट लाभ मिळणार, 30 मार्चपूर्वी…

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २७ जानेवारीपासून ‘या’ भागांत १० टक्के पाणीकपात; पाहा संपूर्ण यादी
3

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २७ जानेवारीपासून ‘या’ भागांत १० टक्के पाणीकपात; पाहा संपूर्ण यादी

KRK Firing Incident: मुंबईत गोळीबाराचा थरार! अभिनेता केआरके पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडल?
4

KRK Firing Incident: मुंबईत गोळीबाराचा थरार! अभिनेता केआरके पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.