
सांगलीत माजी खासदार संजयकाका पाटील यांचे पॅनेलही लढणार
नुकतीच तासगाव नगरपरिषद निवडणुकीत पार पडली. लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभेतल्या निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या माजी खासदार संजय काका पाटील यांना तासगाव नगर परिषदेत यश मिळाले. त्यामुळे, अखेर दोन पराभवाच्या नंतर संजय पाटील यांच्या अंगावर निवडणूक निकालाच्या निमित्ताने गुलाल उधळला गेलाय. येथील नगरपालिकेतील आर.आर. आबांचे सुपुत्र आमदार रोहित पाटील यांच्या आघाडीचा पराभव झाला आहे. ज्या भाजपने त्यांना नाकरले त्याच भाजपचे डिपॉझिट जप्त करण्याची किमया संजयकाका यांनी केली आहे, आता तसागवचा गड जिंकून काकांनी सांगलीकडे कूच केली आहे.
माझ्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या पराभवाचे आत्मपरीक्षण करा; पडळकरांचा विरोधकांना टोला
प्रबळ दावेदारांना आणखी एक पर्याय
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-सेना एकत्र आली आहे, मात्र राष्ट्रवादी बाबत एकमत झालेले नाही, दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आघाडी झाली असल्याचे खासदार विशाल पाटील, आमदर विश्वजीत कदम आणि आमदार जयंत पाटील यांनी एकत्र पत्रकार बैठक घेऊन जाहीर केले आहे, त्यात आता मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काय भुमीका घेतात, हे अजून स्पष्ट झाले नसताना, ज्या प्रबळ उमेदवारांना या पक्षांनी डावलले आहे, अशा उमेदवारांना घेऊन संजयकाका स्वतःची स्वाभिमानी विकास आघाडी सांगलीच्या पटलावर आणत आहेत.
Maharashtra Politics : काँग्रेसला खिंडार! 2 माजी महापौरांसह 12 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
काकांची सुरुवात सांगलीतूनच
संजयकाका पाटील यांचा राजकीय संघर्ष सर्वपरिचित आहे, मात्र त्यांच्या राजकारणाची सुरुवात सांगली शहारातूनच झालेली आहे, तत्कालीन नगरपालिकेत काका नगरसेवक, उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत, त्यानंतर माजी मंत्री मदन पाटील यांच्यासोबत राजकीय संघर्ष राहिला, पुढे त्यांचे चुलते आमदर दिनकरआबा पाटील यांचे वारसदार म्हणून काकांनी तासगाव तालुक्यात आपलं राजकारण विस्तारले. त्यामुळं काकांना सांगली नवी नाही, त्यात दोनवेळा खासदार असताना अनेक नगरसेवक यांच्या संपर्कात होते, हे सर्व गणित आता काका पुन्हा मांडत आहेत.