Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात ग्रंथ आणि शारदा लिपी प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन; राष्ट्रीय पाण्डुलिपी मिशनचे संचालक डॉ. अनिर्वाण दाश यांची प्रमुख उपस्थिती

  • By युवराज भगत
Updated On: Jul 25, 2023 | 07:35 PM
पुण्यात ग्रंथ आणि शारदा लिपी प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन; राष्ट्रीय पाण्डुलिपी मिशनचे संचालक डॉ. अनिर्वाण दाश यांची प्रमुख उपस्थिती
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : वैदिक संशोधन मंडळ (आदर्श संस्कृत शोध संस्था) पुणे येथे दिनांक २४ जुलै २०२३ रोजी पाच दिवसीय ग्रंथ आणि शारदा लिपी प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, राष्ट्रीय पाण्डुलिपी मिशनचे संचालक डॉ. अनिर्वाण दाश व कार्यक्रमाचे विशेष अतिथी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे प्रमुख प्रा. देवनाथ त्रिपाठी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून वैदिक मंत्रांसह कार्यक्रमाला सुरुवात झाली. या प्रसंगी डॉ. ओंकार जोशी यांनी वैदिक मंत्रपठण केले आणि डॉ.वैष्णवी पाटील यांनी शारदा स्तवन केले.

राष्ट्रीय पाण्डुलिपि मिशनचा परिचय

डॉ. विरिवेंटि सुब्रह्मण्यम्,प्रभारी संचालक, वैदिक संशोधन मंडळ यांनी अतिथींचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. श्री. कृष्णा माळी यांनी अतिथींचा परिचय करून दिला. डॉ. अनिर्वाण दाश यांनी हस्तलिखितांवर काम करणाऱ्या राष्ट्रिय पाण्डुलिपि मिशनचा परिचय करून दिला व हस्तलिखितांशी संबंधित योजनांचा तपशील दिला. या ज्ञानार्जनातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या नव्या संधी व संशोधन क्षेत्रातील खुली होणारी दालने याबाबत माहिती दिली. विद्यार्थी व संशोधकांसाठी या क्षेत्रात अशा प्रकारच्या कार्यशाळांच्या आयोजनांवर भर दिला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

लिपी आणि भाषा एकमेकांवर अवलंबून

त्याचबरोबर प्रा. देवनाथ त्रिपाठी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लिपी आणि भाषा एकमेकांवर अवलंबून असतात त्यामुळे भाषेइतकेच लिपीलादेखील महत्त्व आहे, असेही त्यांनी प्रतिपादन केले. तसेच प्रा. सरोजा भाटे यांची विशेष उपस्थिति या कार्यक्रमास होती. यांनीही या कार्यशाळेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यानंतर सौ. मुक्ता मुळे-सराफ यांनी आभार व्यक्त केले व डॉ. विद्या सागी यांनी एकात्मता मंत्राने कार्यक्रमाची सांगता केली.

कृष्णा माळी आणि विद्या सागी देणार लिपीचे प्रशिक्षण
या कार्यक्रमास संस्कृत, प्राकृत, प्राच्यविद्या क्षेत्रातील अनेक प्राध्यापक, संशोधक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभरातून ४५ प्रशिक्षणार्थी या कार्यशाळेत सहभागी झालेले आहेत. संस्थेतील संपादक कृष्णा माळी हे शारदा लिपीचे तर प्रतिलिपिका डॉ. विद्या सागी या ग्रंथ लिपीचे प्रशिक्षण देणार आहेत.

Web Title: Inauguration of granth and sharda script training workshop at pune keynote presence of dr anirvan dash director of national manuscript mission nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2023 | 07:27 PM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

मला माझा नवरा परत द्या; गायब पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांच्या पत्नीची विनंती
1

मला माझा नवरा परत द्या; गायब पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांच्या पत्नीची विनंती

समाजाच्या गरजा समजून घेतल्याशिवाय उद्योजकता शक्य नाही; एमकेसीएलचे संस्थापक विवेक सावंत यांचे मत
2

समाजाच्या गरजा समजून घेतल्याशिवाय उद्योजकता शक्य नाही; एमकेसीएलचे संस्थापक विवेक सावंत यांचे मत

कामावर असताना मृत्यू झाल्यास तातडीने 5 लाखांची मदत देणार; पुणे महापालिकेचा मोठा निर्णय
3

कामावर असताना मृत्यू झाल्यास तातडीने 5 लाखांची मदत देणार; पुणे महापालिकेचा मोठा निर्णय

आचारसंहितेच्या शक्यतेमुळे प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर; कोट्यवधी रुपयांच्या निविदांना मंजूरी
4

आचारसंहितेच्या शक्यतेमुळे प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर; कोट्यवधी रुपयांच्या निविदांना मंजूरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.