Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP : उद्या राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद गट स्थापन होणार? पक्षाने बोलावली महत्वाची बैठक

पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत गट स्थापन करण्यासाठी उद्या (शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६) महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 05, 2026 | 04:34 PM
उद्या राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद गट स्थापन होणार? पक्षाने बोलावली महत्वाची बैठक

उद्या राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद गट स्थापन होणार? पक्षाने बोलावली महत्वाची बैठक

Follow Us
Close
Follow Us:
  • उद्या राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद गट स्थापन होणार?
  • पक्षाने बोलावली महत्वाची बैठक
  • पुणे जिल्हा बँकेच्या सभागृहात होणार बैठक
पुणे : पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत गट स्थापन करण्यासाठी उद्या (शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६) महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडणार असून, जिल्हा परिषद सदस्य, पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

 

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. त्या अनुषंगाने उद्याच्या बैठकीत जिल्हा परिषदेमधील अधिकृत पक्षगटाची स्थापना करून गटनेते आणि प्रमुख पदांबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आगामी निवड प्रक्रियेबाबत रणनीती निश्चित करण्यावरही बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.

पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असल्याने अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी पक्षातील एकजूट आणि समन्वय राखण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांना निमंत्रित करण्यात आले असून पक्षाचे आमदार, माजी आमदार तसेच जिल्हा पातळीवरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भातील संभाव्य उमेदवारांबाबतही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उद्या होणारी बैठक पुणे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा : ठाकरेंच्या शब्दाला किंमत उरली नाही, उबाठातील सर्व निर्णय…; भाजपच्या नेत्याची टीका

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून राजकारण रंगले

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले झाले आहे. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठी रस्सीखेच निर्माण झाली आहे. मिनी मंत्रालयाच्या चाव्या अनुभवी की तरुण सदस्याकडे द्यायच्या यावर पक्षात खल सुरू आहे. सत्तावाटपाचे सूत्र ठरविताना अनुभवी व तरुण चेहऱ्यांचा मेळ घातला जाऊ शकतो. इच्छुक सदस्यांनी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली आहे. मात्र, ऐनवेळी अजित पवार यांच्या धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी राजकीय गणिते लक्षात घेऊन रणनीती आखायचे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीतून त्यांचा मुत्सद्दीपणा दिसून यायचा. त्यांनी निवड केलेल्या बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी पुढे चमकदार कामगिरी केली आहे.

Web Title: The official group of the nationalist congress party in pune zilla parishad will be formed tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • pune news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Pune Census 2026: १६ मे पासून प्रगणक तुमच्या दारी; प्रशासनाने आखली १०,१७२ परिमंडळे
1

Pune Census 2026: १६ मे पासून प्रगणक तुमच्या दारी; प्रशासनाने आखली १०,१७२ परिमंडळे

‘नाथजल’ 15 रुपयांनाच द्या, अन्यथा…; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विक्रेत्यांना सज्जड दम
2

‘नाथजल’ 15 रुपयांनाच द्या, अन्यथा…; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विक्रेत्यांना सज्जड दम

PMPML News : ‘आपले पीएमपीएमएल’ ॲपला प्रवाशांचा प्रतिसाद; काही दिवसातच हजारो पुणेकरांनी डाऊनलोड केले ॲप
3

PMPML News : ‘आपले पीएमपीएमएल’ ॲपला प्रवाशांचा प्रतिसाद; काही दिवसातच हजारो पुणेकरांनी डाऊनलोड केले ॲप

PCMC Water Supply: श्रीमंत महापालिका पण पाण्याचा दुष्काळ! दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण; टँकर लॉबीचा विळखा
4

PCMC Water Supply: श्रीमंत महापालिका पण पाण्याचा दुष्काळ! दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण; टँकर लॉबीचा विळखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.