Increasing traffic signal times are causing costly rickshaw and taxi passengers to pay more.
मुंबई : घर-कार्यालय ते रेल्वे स्थानक, जवळचा प्रवास करण्यासाठी मुंबईकर रिक्षा-टॅक्सीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. परंतु प्रवासादरम्यान ६ ते ८ वाहने पुढे गेली की सिग्नल पडतो आणि वाहने अडकतात. सिग्नल सुरू होईपर्यंत पुन्हा वाहनांच्या रांगा वाढतात. पुन्हा सिग्नल सुटतो, काही वाहने निघतात. शहरात एक सिग्नल पास करण्यासाठी किमान ८ ते १० मिनिटांचा कालावधी लागत असल्याने रिक्षा-टॅक्सीचे मीटर वाढत जाते. त्यामुळे प्रवाशांना कमी प्रवासासाठी देखील जादा पैसे मोजावे लागत आहेत. सध्याच्या घडीला रिक्षा ३० सेंकदापेक्षा जास्त काळ थांबल्यास त्या काळात वेटिंग चार्ज चालकाला मिळतो. रिक्षाचा पहिला टप्पा १.६ किलोमीटरचा आहे. परंतु अनेक प्रवासी १ किलोमीटर किंवा ८०० मीटर असा प्रवास करतात. त्यामुळे मूळातच या प्रवाशांचे काही मीटरचे अंतराचे पैसे शिल्लक असतात. मात्र शहरातील वाहतूकीच्या कोंडीमुळे वाहनांचा वेग मंदावतो. त्यातच सिग्नलवर देखील बराच वेळ वाहने उभी असतात. यामुळे मीटर वाढते. मीटर वाढल्याने जवळच्या प्रवासाकरिता देखील प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागतात.
मुंबई शहरात तब्बल ६८५ ट्रफिक सिग्नल आहेत. मुंबईत २५० ते ८० सेकंदापर्यंत सिग्नलचा कालावधी आहे. शहरात २२८ सिग्नल ऑटोमेशन आणि ४२७ सिग्नल फिक्स टाईप प्लनमधील आहेत. शहरात वरळी नाका. मीठ चौकी (लिंक रोड) केम्स कॉर्नर, वाकोला जंक्शन हे चार सिग्नल सर्वाधिक २५० सेकंद म्हणजेच ४ मिनिट १० सेकंदाचे आहेत. त्यानंतर २०० सेकंद ३ मिनिटे २० सेकंदामध्ये मेट्रो, टर्नर रोड, एच.पी. पेट्रोल पंप (बांद्रा), एल. बी. एस कुर्ला डेपो, एनटीपीसी (पवई) साकी विहार (पवई आयआयटी). ऐरोली या सिग्नलचा समावेश आहे.
वाहतूक पोलिस विशिष्ट परिसरातील वाहनांच्या संख्येनुसार सिग्नल लावण्यास मुंबई महापालिकेला सांगतात. या सिग्नलचा कालावधी देखील वाहतूक पोलिस ठरवतात. या सिग्नलच्या देखभाल-दुरुस्तीचे काम महापालिका करते. तीन-चार आर्मनुसार सिग्नल लावण्यात येतात.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
श्रेयस सिनेमा, छेडा नगर, अंधेरी, बांद्रा, साकीनाका, विलेपार्ले, ओल्ड विमानतळ सिग्नल, सांताकुझ, सायन, पवई जंक्शन, मालाड, गोरेगाव, चेंबूर, ठक्कर बाप्पा कॉलनी, लाल डोंगर, चेंबूर कॉलनी, लिकिंग रोड, जुहू पोलिस स्टेशन, चार बंगला येथील सिग्नलवर सकाळी संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी असते. खास करुन संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने येतात. त्यामुळे सिग्नलवर बराच वेळ वाहनांना थांबावे लागते.
■ २५० सेकंद (४ मिनिट १० सेकंद)- वरळी नाका, मीठ चौकी (लिंक रोड), केम्स कॉर्नर, वाकोला जंक्शन
■ २०० ते २४० सेकंद (३ मिनिट २० सेकंद)- मेट्रो, टर्नर रोड, एच.पी. पेट्रोल पंप (बांद्रा), एल. बी. एस कुर्ला डेपो, एनटीपीसी (पवई), पिझा हट, साकी विहार (पवई आयआयटी), ऐरोली
■ १०० ते १५० सेकंद छेडा नगर, साकीनाका जंक्शन, रिंगल जंक्शन, विलेपार्ले, सायन, मालाड, श्रेयस सिनेमा, बांद्रा, सांताक्रुझ, मुलुंड, घाटकोपर
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वेग कमी झाल्याने रिक्षाचा वेटिंग मीटर वाढतो. त्यामुळे पैसे वाढतात. परिणामी रिक्षाचा पहिला टप्पा १.६ किमी कायम ठेवून इलेक्ट्रॉनिक सिग्नलवर मॅन्युअली यंत्रणा उभी करावी, जेणेकरुन वेटिंग मीटर वाढणार नाही. तसेच वाहतूक सुरळित होण्यास मदत होईल, असे मत महाराष्ट्र रिक्षा-चालक संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र देसाई यांनी केले आहे.