माळेगाव शहरातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठ परिसरात रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात माळेगाव वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे.
कोपरखैरण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम असून, गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्याऐवजी ई-चालान कारवाईवरच भर दिला जातोय का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात…
Pune Ahmednagar Highway Traffic Jam: वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत रस्त्यांची क्षमता आणि वाहतूक व्यवस्थापन अपुरे पडत असल्याने वाहनांना अनेकदा तासन्तास कोंडीत अडकून राहावे लागते. त्याचा थेट परिणाम उद्योगांचे दैनंदिन कामकाज, उत्पादन…
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केवळ रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यापुरते मर्यादित न राहता कोंडीची कारणे दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या आहेत.
पुणे शहर आणि परिसरातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी प्रस्तावित पुणे चक्राकार मार्गाचे (रिंग रोड) काम वेगाने सुरू आहे.
वडगाव शहरातील दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे निर्माण होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्ष महिला आघाडी, वडगाव-कातवी शहर यांनी प्रशासनाकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सध्याची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तात्काळ राबविता येतील अशा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी प्राधान्याने करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले.
औद्योगिक क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात महाळुंगे वाहतूक विभागाने धडक कारवाईचा बडगा उगारला आहे.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास आता वाहनचालकांसाठी ‘वीकेंडची शिक्षा’ ठरू लागला आहे. प्रत्येक शनिवार-रविवारी महामार्गावर निर्माण होणारी वाहतूक कोंडी आता नित्याची बाब झाली आहे.
मोटार वाहन (दुरुस्ती) अधिनियम २०१९ तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ६७ (३) अंतर्गत राज्य सरकारांना प्रवासी वाहतूक व्यवस्थेचे नियमन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
धुुळवडीच्या निमित्ताने भांग पिऊन किंवा दारु पिऊन रसत्यावर धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांची काही कमी नाही. याच तळीरामांना अद्दल घडवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज होतं.
निगडी-दापोडी मार्गावरील 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' ग्रेडसेपरेटरमध्ये मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास एक अवजड कंटेनर अडकल्याने वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा झाला.
शहरातील चाळीस सिग्नलवर सिग्नल मोडण्याची घाईच वाहनचालकांना असते. सीसीटीव्ही कॅमेरे अशा वाहनचालकांचे छायाचित्र लागलीच नियंत्रण विभागातील वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना पाठवतो.
महामार्ग अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा सविस्तर अहवाल येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सादर करण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी संबंधित विभागांना दिले.
TomTom Traffic Index 2025 च्या रिपोर्टनुसार, भारतातील मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिक ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. चला अशा काही शहरांबद्दल जाणून घेऊयात, जिथे नागरिक त्यांच्या आयुष्यातील 100 तास ट्रॅफिकमध्ये…