Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजापूर मतदारसंघात साकारला मानवी साखळीतुन भारत

लोकसभा निवडणूकीमध्ये राजापूर विधानसभा मतदार संघातील मतांचा टक्का वाढविण्याच्या उद्देशाने शहरातील राजीव गांधी क्रीडांगणावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 17, 2024 | 12:26 PM
राजापूर मतदारसंघात साकारला मानवी साखळीतुन भारत
Follow Us
Close
Follow Us:

राजापूर : लोकसभा निवडणूकीमध्ये राजापूर विधानसभा मतदार संघातील मतांचा टक्का वाढविण्याच्या उद्देशाने शहरातील राजीव गांधी क्रीडांगणावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून त्याद्वारे भारताचा भव्य नकाशा साकारत मतदान जनजागृती केली. यावेळी पथनाट्य, मतदान प्रतिज्ञेद्वारेही जनजागृती करण्यात आली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैशाली माने यांनी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन केले.

लोकसभा निवडणूका जाहीर झाल्या असून यामध्ये राजकीय पक्षांसह उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. त्यातून, निवडणूकीची वातावरण निर्मिती झाली आहे. या निवडणूकीसाठा होणार्‍या मतदानाची पूर्वतयारी करण्यामध्ये प्रशासन गुंतले आहे. त्याचवेळी गतवेळीपेक्षा यावेळी मतदानाचा टक्का वाढावा यासाठीही प्रशासन प्रयत्नशील असून त्यासाठी विविध उपक्रमही राबविले जात आहेत. त्यामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती माने यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृती करणारे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये शहरातील राजीव गांधी क्रीडांगणावर विविध उपक्रम पार पडले.

तहसिलदार शितल जाधव, गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले, महूल विभागाचे मंडल अधिकारी बाजीराव पाटील यांसह मोठ्यासंख्येने शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारीवृंद उपस्थित होते. त्यावेळी शहरातील हायस्कूलसह जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थींनी एकत्रित येत मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा साकारत सार्‍यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी सुभाष चोपडे, प्रविण किंजळस्कर, संदीप परटवलकर, गणेश वाले, सुनिल भांडेकर, मानसी सुर्वे, समिधा कोलते, शुभांगी सागरे, मनिषा नागरगोजे, प्रिया किंजळस्कर, सुदर्शन घागरे, रविंद्र लाड आदी सहभागी शिक्षकांनी मतदार जनजागृतीसाठी सादर केलेल्या पथनाट्याने सार्‍यांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी बोलताना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती माने यांनी सार्‍यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे .

Web Title: India through human chain realized in rajapur constituency loksabha election chiplun ratnagiri nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2024 | 12:26 PM

Topics:  

  • Election
  • election 2024

संबंधित बातम्या

Raigad News: ‘गुणवत्तेचा नेता की आर्थिक ताकद?’ म्हळसा तालुक्यात निवडणुकीचा रणसंग्राम सुरू, राजकीय पक्षांची कसोटी
1

Raigad News: ‘गुणवत्तेचा नेता की आर्थिक ताकद?’ म्हळसा तालुक्यात निवडणुकीचा रणसंग्राम सुरू, राजकीय पक्षांची कसोटी

Chandrapur News: राजकारणात नवा फॉर्म्युला! अनुभवी नेतृत्वासोबत नव्या चेहऱ्यांचा उदय, विकासाची अपेक्षा वाढली
2

Chandrapur News: राजकारणात नवा फॉर्म्युला! अनुभवी नेतृत्वासोबत नव्या चेहऱ्यांचा उदय, विकासाची अपेक्षा वाढली

Raigad News: रायगडमध्ये राजकारण तापलं! आगामी निवडणुकांसाठी नेते कायद्याच्या कचाट्यात, राजकीय हालचालींना वेग
3

Raigad News: रायगडमध्ये राजकारण तापलं! आगामी निवडणुकांसाठी नेते कायद्याच्या कचाट्यात, राजकीय हालचालींना वेग

चंद्रपुरात निवडणुकीत उतरले अनेक साक्षर उमेदवार! निरक्षरांची संख्या किती? वाचा
4

चंद्रपुरात निवडणुकीत उतरले अनेक साक्षर उमेदवार! निरक्षरांची संख्या किती? वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.